शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Farmers Protest : नरेंद्र मोदींनी ज्या MSP बद्दल राज्यसभेत मोठी घोषणा केली, ती MSP म्हणजे काय माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 13:15 IST

PM Narendra Modi on MSP in Rajya Sabha Speech : शेतकऱ्याच्या हितासाठी देशामध्ये किमान आधारभूत किंमत (MSP) ची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने विविध धान्यांसाठी आणि पिकांसाठी किमान आधारभूत किमती ठरवलेल्या आहेत.

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल करत नवीन कृषी कायद्यांमध्ये शेतमालाची किमान आधारभूत किंमत (MSP) आहे, राहील आणि यापुढेही राहील, असे ठणकावून सांगितले.

नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. यात कोणतीही तडजोड करण्यास ते तयार नाहीत. विरोधकांनी सुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून या कृषी कायद्यांना विरोध केला आहे. दुसरीकडे किमान आधारभूत किंमती संदर्भात कोणतेही बदल केलेले नाहीत. या नवीन कायद्यांमध्ये केवळ बाजार समित्या संदर्भातील नवीन नियम आहेत. त्याचबरोबर शेतकरी आपला माल देशभरात कुठेही विकू शकतो, या संदर्भातील तरतूद केली आहे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ज्यावरून हा गदारोळ सुरू आहे ती किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP नेमकं काय? ती कशी ठरते आणि कोण ठरवतं? यावर एक नजर टाकू या....

किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ?शेतकऱ्याच्या हितासाठी देशामध्ये किमान आधारभूत किंमत (MSP) ची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने विविध धान्यांसाठी आणि पिकांसाठी किमान आधारभूत किमती ठरवलेल्या आहेत. बाजारात जरी शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली, तर तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळते.  एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसमान असतो. कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायझेस - CACP च्या आकडेवारीवरून भारत सरकारचे कृषी मंत्रालय हमीभाव ठरवते. यानुसार सध्या 23 शेतमालांची खरेदी सध्या सरकार करते. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे. देशातल्या फक्त 6 टक्के शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो आणि यामध्ये पंजाब - हरियाणाच्या शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचा अंदाज आहे. याच कारणामुळे या नवीन विधेयकाला या भागांतूनच जास्त विरोध होत आहे.

राज्यसभेत नरेंद्र मोदी काय म्हणाले?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन करणं योग्य नाही, शेतकऱ्यांनी पुढे येऊन चर्चा करावी, कृषिमंत्र्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेतच, पण वयोवृद्ध लोकांना घेऊन आंदोलनात बसणे योग्य नाही. तसेच, एकदा सुधारणा करून लाभ होतोय का नाही हे पाहायला हवे, त्रुटी असेल ती दुरुस्त करूया.. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल त्याचसोबत MSP आहे, राहील आणि यापुढे राहणार आहे, त्यामुळे भ्रम पसरवू नका, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणं गरजेचे आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आपणास आणखी काम करायचे आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये असा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.

(Narendra Modi: “MSP होता, आहे अन् राहणार; चूक झाली तर माझ्या माथी मारा, चांगलं झालं तर श्रेय तुम्ही घ्या”)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीRajya Sabhaराज्यसभाFarmers Protestशेतकरी आंदोलन