शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

Farmers Protest : राकेश टिकैत यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती? टिकैत यांनी स्वतःच सांगितलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 16:19 IST

कृषी कायद्यांसंदर्भात समर्थन मिळविण्यासाठी टिकैत महापंचायत करत आहेत. संपत्तीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून टिकैत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth)

नवी दिल्ली -शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) मुख्य चेहरा आणि भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर वरोधकांकडून अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. यातच त्यांच्या संपत्तीसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहे. टिकैत यांच्याकडे कोट्वधींची संपत्ती आणि मॉल आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर टिकैत यांनी भाष्य केले आहे. (Farmer leader Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth of crores)

संपत्तीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून टिकैत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. एनडीटीव्हीशी बोलताना टिकैत म्हणाले, त्यांनी कमी  आकलन केले आहे. अधिक करायला हवे. आमच्याकडे खूप संपत्ती आहे. किती आहे, हे आम्हालाही माहीत नाही. अनेक हजार करोड असेल. अनेक पटवारी, अधिकारी आणि सरकारं लावावी लागतील तेव्हा मोजली जाईल.

Farmers Protest : "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते", मुख्यमंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला

कृषी कायद्यांसंदर्भात समर्थन मिळविण्यासाठी टिकैत महापंचायत करत आहेत. पंचायतीत पूर्वीच्या तुलनेत लोक कमी झाले आहेत, असे विचारले असता, आंदोलन सुरूच राहील. आंदोलन संख्येवर चालत नाही. शेतकरी शेतात कामही करेल आणि आंदोलन तथा पंचायतीतही राहील, असे टिकैत म्हणाले.

शेतकरी नेत्यांत दरीच्या वृत्तांसंदर्भात टिकैत म्हणाले, विरोधकांना काहीच मिळात नाही. त्यामुळे ते 40 शेतकरी नेत्यांत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नेत्यांवर संपत्तीचा आरोप लावला जात आहे.

20 फेब्रुवारीला राकेश टिकैत यांची यवतमाळमध्ये सभा -केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायद्यांविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारी धार्जिणे असून त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड लूट होणार आहे. दरम्यान हे कायदे परत घ्यावेत अशी मागणी केली जात आहे. याच पार्शवभूमीवर आता राकेश टिकैत 20 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता यवतमाळमध्ये सभेसाठी येणार आहेत.

टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका

"राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते" - तत्पूर्वी, हरियाणा (Haryana) चे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना सणसणीत टोला लगावत, "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते" असल्याचे म्हटले होते. तसेच शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा, असेही ते म्हटले होते.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरी