शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : सिंघू, टिकरी बॉर्डरवरची गर्दी ओसरली पण शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत केला मोठा दावा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 08:46 IST

Farmers Protest : सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्‍यांच्या प्रमुख आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी ओसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. अशा परिस्थितीत सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्‍यांच्या प्रमुख आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी ओसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मात्र आता शेतकरी नेत्यांनी आंदोलन पूर्वीपेक्षा अधिक बळकट होत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीच्या सीमेवर लंगर आणि तंबू रिकामे असूनही आंदोलनाला अधिक गर्दी होत असल्याचं शेतकरी नेते सांगत आहेत. आंदोलनाला बळ देण्यासाठी गर्दी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे (पंजाब) अवतार सिंग मेहमा यांनी "गर्दी अजिबात कमी झालेली नाही. आम्ही फक्त पंजाब आणि हरियाणामध्येच नव्हे तर इतर राज्यातील खेड्यात आणि जिल्ह्यात जनतेचा पाठिंबा वाढवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत. पंजाबमध्ये लाट निर्माण करण्यास काही महिने लागले. तर देशात अशा प्रकारचे प्रभाव निर्माण होण्यास थोडा अधिक वेळ लागेल. पण आमच्या आंदोलनाचा वेग कमी झालेला नाही. आमच्या दृष्टीकोनातून हे आंदोलन दिवसेंदिवस मजबूत होत आहे" असं म्हटलं आहे. तसेच अनेक शेतकरी घरून परत येत आहेत. ते थोड्या काळासाठी घरी जातात आणि नंतर परत येतात. कारण त्यांना शेतीची कामेही सांभाळावी लागतात. तरीही सीमेवरील आंदोलकांची संख्या स्थिरच आहे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

""चक्का जाम" नंतर गर्दी वाढण्याची अपेक्षा" 

"18 फेब्रुवारीच्या "चक्का जाम" नंतर गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे. संयुक्त किसान मोर्चा दिल्लीच्या सीमेवर संख्या स्थिर ठेवण्यासाठी रणनीती आखत आहे. यामुळे आंदोलकांना घरकामाचे व्यवस्थापन करता येईल. पण सीमेवर लोकांची संख्या 18 फेब्रुवारी नंतरच वाढेल. लवकरच, आम्ही देशभरातील शेतकऱ्यांनाही दिल्लीतल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करणार आहोत" असं देखील अवतार सिंग मेहमा यांनी म्हटलं आहे. जेव्हा मी महापंचायतीसाठी करनालला गेलो होतो, तेव्हा सिंघूमधील अनेक लोक माझ्याबरोबर होते आणि ते पुन्हा परत आले. आम्ही राजस्थानमधील सीकर आणि पूर्व उत्तर प्रदेशातील बर्‍याच भागातील लोकांना देखील एकत्रित करत आहोत. पण ही तात्पुरती परिस्थिती आहे. 18 फेब्रुवारी नंतर पुन्हा गर्दी होईल असं भारतीय किसान युनियन एकताचे (दकौदा) सरचिटणीस जगमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. 

".... ते फक्त एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात आहेत"

बीकेयू (लखोवाल) सरचिटणीस परमजीत सिंग यांनी "लोकांना महापंचायतीत सहभागी व्हायचे आहे. खासकरुन राकेश टिकैतसारखे नेते सांगत असल्याने ते कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातात. पण याचा अर्थ असा नाही की ते माघारी जात आहेत. ते फक्त एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात आहेत" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत असं टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच देशाचं धोरण संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून बदलू असंही ते म्हणाले. 

"अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?"

पंतप्रधान मोदींच्या आंदोलनजीवी टीकेवरही टिकैत यांनी हल्लाबोल केला असून एक प्रश्न विचारला आहे. राकेश टिकैत यांनी "अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलं आहे. यावेळी टिकैत यांना त्यांच्या अश्रूंबाबत देखील प्रश्न विचारला गेला. तेव्हा हे शेतकर्‍यांचे अश्रू आहेत, भीतीचे नाहीत. 26 जानेवारीला पोलिसांसमोर गुंड होते. ते लाठ्या चालवत होते. पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये लाठ्या घेऊन कोण आलं होतं हे पोलिसांनी सांगावं असं देखील म्हटलं आहे. शेतकरी आणि आपल्यात फक्त एका फोन कॉलचं अंतर आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शेतकरी नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. त्यावर देखील राकेश टिकैत यांनी उत्तर दिलं. आम्ही कोणाशी चर्चा करायची. आम्हाला कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनIndiaभारतdelhiदिल्लीPunjabपंजाबFarmerशेतकरीrakesh tikaitराकेश टिकैत