शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Farmers Protest: कोरोनाची दहशत! दिल्ली सीमेवर रिकामे टेंट उरले; आंदोलक शेतकरी माघारी फिरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 08:46 IST

यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे.

ठळक मुद्देसुरूवातीच्या काळात जे टेंट लावले होते ते तसेच आहेत. यातील बहुतांश टेंट रिकामे आहेत.यूपी गेट परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होतेजरी लॉकडाऊन लागलं तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत, शेतकरी नेते राकेश टीकैत यांचा इशारा

नवी दिल्ली – राजधानी दिल्ली आणि परिसरात कोरोनाचा कहर जसा जसा वाढत गेला तसं याठिकाणी गेल्या ४ महिन्यापासून आंदोलनात बसलेले शेतकऱ्यांनीही काढता पाय घेतला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. गेल्या अनेक महिन्यापासून हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी जोवर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरुच राहील असा दावा केला. परंतु सीमेवर आंदोलनस्थळी परिस्थिती मात्र वेगळीच आहे.

यूपी गेट परिसरात हजारोंच्या संख्येने काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनास बसले होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. येथील शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परंतु सुरूवातीच्या काळात जे टेंट लावले होते ते तसेच आहेत. यातील बहुतांश टेंट रिकामे आहेत. यूपी गेट येथे २८ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू होतं. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते.

यूपी गेट परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात. त्यामुळे टेंट रिकामेच पडले आहेत. रिकामे टेंट असूनही नेते ते हटवत नाहीत. त्यामुळे केवळ टेंटच्या सहाय्याने शेतकरी आंदोलन सुरू असल्याचं दिसून येते.

एमएसपीवर कायदा होईपर्यंत थांबणार

"जो पर्यंत हे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत आणि एमएसपीवर कायदा तयार केला जात नाही तोवर आंदोलक शेतकरी आपलं आंदोलन स्थगित करणार नाहीत. सर्व शेतकरी सीमेवर बसून राहतील. सरकारनं कोणत्याही चुकीच्या समजूतीत राहू नये आणि त्यांचं आदोलन दीर्घ कलावधीसाठी चालणार आहे,असं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले.  

"जरी लॉकडाऊन लागलं तरी शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत. कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. देशात आपात्कालिन कर्फ्यू लावण्यात आला किंवा कोणतीही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तरी शेतकरी मागे हटणार नाहीत," असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनcorona virusकोरोना वायरस बातम्या