शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या सहाय्यानं ड्रोनचा सामना, शेतकऱ्यांचा 'देशी जुगाड' पाहून थक्क व्हाल! पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 00:44 IST

पोलिसांच्या या ड्रोनचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक अनोखा जुगाड शोधून काढल आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात शंभू सीमेवर संघर्ष सुरू आहे. आपल्या मागण्या घेऊन दिल्लीला जाण्याच्या निर्णयावर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी पोलीस वेगवेगळे उपाय अवलंबत आहेत. याचाच एक भाग म्हणून, या शेतकरी आंदोलकांवर अश्रुधूर सोडण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. मात्र, पोलिसांच्या या ड्रोनचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक अनोखा जुगाड शोधून काढल आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओंमध्ये शेतकरी पतंगाच्या सहाय्याने ड्रोनचा सामना करताना दिसत आहेत. 

अश्रुधूर सोडण्यासाठी ड्रोनचा वापर -पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमले आहेत. विविध मागण्यांसंदर्भात केंद्रावर दबाव आणण्यासाठी ते दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी बॅरिकेड तोडण्याचाही प्रयत्न केला. या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी मंगळवारी त्यांच्यावर अश्रुधुराचे गोळे सोडण्यासाठी एक ड्रोन तैनात केले होते. यातच, या ड्रोनच्या सहाय्याने पंजाब परिसरात आपल्यावर अश्रुधुराचे गोळे सोडण्यात आल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला. मात्र, या ड्रोनवरचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी खास जुगाड शोधून काढला आहे. त्यांनी पतंग उडवायला सुरुवात केली आहे. यानंतर ड्रोनला तेथून माघार घ्यावी लागली आहे.

 

सरकारसोबत चर्चेची तिसरी फेरी होणार -दुसरीकडे, गुरुवारी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. यात सरकारकडून तीन केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. मात्र, सरकारच्या दबावाला आपण बळी पडणार नाही आणि आपल्या सर्व मागण्या सरकारला मान्य करायलाच लावणार असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. शेतकरी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेतकरी कर्जमाफी, पोलिस खटले मागे घ्यावेत आणि लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना 'न्याय' मिळावा, आदी मागण्या शेतकरी करत आहेत.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनPunjabपंजाबdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारPoliceपोलिस