शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील शेतकरी संघटना येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 21:10 IST

नवी दिल्ली : सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना एकवटल्या असून येत्या 20 नोव्हेंबरला सर्व शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह 180 शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. आज यासंदर्भात विविध राज्यातील शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. ...

ठळक मुद्देशेतकरी संघटना येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत धडकणार180 शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार राज्यातील शेतकरी नेत्यांची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना एकवटल्या असून येत्या 20 नोव्हेंबरला सर्व शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह 180 शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. आज यासंदर्भात विविध राज्यातील शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशातील विविध भागातील शेतकरी  नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहेत. वर्षभरापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी व योग्य हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान,  कर्जमाफी आणि हमीभावावरुन शेतकऱ्यांनी देशभरात अनेक आंदोलने केली. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीने हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. यावेळी येथील  आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याविरोधात किसान संघर्ष समितीने देशभरात 10 हजार किलोमीटरची ही पदयात्रा काढली होती. या पदयात्रेची सांगता दिल्लीत होणार आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी