शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:44 IST

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर सरकार १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, असे खुद्द मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले. यातच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शनिवारी तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, ‘तेलंगणातील शेतरी कुटुंबांना शुभेच्छा. काँग्रेस सरकारने आपले 2 लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून शेतकरी न्यायाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. यामुळे 40 लाखहून अधिक शेतकरी कुटुंब कर्ज मुक्त होतील. जे बोललो, करून दाखवलं, हीच नियत आहे आणि सवयही.’

47 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा - राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेस सरकारचा अर्थ, राज्याच्या तिजोरीतील पैसा शेतकरी, मजूर आणि वंचित समाजाला मजबूत करण्यासाठी खर्च होईल, याची हमी. तेलंगणा सरकारचा हा निर्णय त्याचे उदाहरण आहे. आमचे आश्वासन आहे की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे-तिथे भारताचा पैसा भारतीयांवर खर्च करेल, भांडवलदारांवर नाही."

तेलंगणा सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील जवळपास 47 लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची रूपरेषा लवकरच अधिसूचित केली जाईल. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने तेलंगणातील जनतेला आश्वासन दिले होते की, राज्यात आपले सरकार आल्यास आपण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. काँग्रेसला या आश्वासनाचा मोठा फायदा झाल्याचेही बोलले जाते. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही कर्जमाफी योजना १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री तथा राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी