शेतकर्‍यांनो, संघटित व्हा! बच्चू कडू यांचे आवाहन; सिरसोली येथे झाली बैठक

By Admin | Updated: June 12, 2015 01:51 IST2015-06-12T01:51:45+5:302015-06-12T01:51:45+5:30

तेल्हारा/सिरसोली : शेतकर्‍यांनो, आपल्या प्रश्नांसाठी संघटित व्हा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी रात्री सिरसोली येथील बैठकीत केले. सिरसोली येथे विजेचा लपंडाव सुरू असून, याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. या पृष्ठभूमीवर आमदार कडू यांनी गुरुवारी शेतकर्‍यांशी संवाद साधला. शेतकर्‍यांकडून होणार्‍या प्रत्येक आंदोलनात आपण सक्रिय सहभाग नोंदवू, अशी ग्वाहीदेखील कडू यांनी दिली.

Farmers, get organized! Bachu Kadu's appeal; Meeting at Sirsoli | शेतकर्‍यांनो, संघटित व्हा! बच्चू कडू यांचे आवाहन; सिरसोली येथे झाली बैठक

शेतकर्‍यांनो, संघटित व्हा! बच्चू कडू यांचे आवाहन; सिरसोली येथे झाली बैठक

ल्हारा/सिरसोली : शेतकर्‍यांनो, आपल्या प्रश्नांसाठी संघटित व्हा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी रात्री सिरसोली येथील बैठकीत केले. सिरसोली येथे विजेचा लपंडाव सुरू असून, याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. या पृष्ठभूमीवर आमदार कडू यांनी गुरुवारी शेतकर्‍यांशी संवाद साधला. शेतकर्‍यांकडून होणार्‍या प्रत्येक आंदोलनात आपण सक्रिय सहभाग नोंदवू, अशी ग्वाहीदेखील कडू यांनी दिली.
तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. उपकेंद्रांतर्गत सिरसोली येथे अनियमित विद्युत पुरवठा होत आहे. गावात आठवड्यातील एक दिवस विद्युत पुरवठा खंडित असतो. विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा व कटपॉइंट बंद व्हावे, या मागण्यांसाठी अडगाव येथील कनिष्ठ अभियंत्यांना ४ जून रोजी निवेदन देण्यात आले होते.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या सभेला प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश खारोडे, माजी उपसरपंच पुरुषोत्तम चौखंडे यांच्यासह सुरेंद्र खोटरे, मंगेश टिकार, विशाल खोटरे, अहमद शाह, धीरज ताकोते, दीपक नागमते, सोपान ठाकरे आदी उपस्थित होते.
फोटो : सिरसोली येथील बैठकीत बोलताना बच्चू कडू व उपस्थित शेतकरी.

Web Title: Farmers, get organized! Bachu Kadu's appeal; Meeting at Sirsoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.