शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 12:18 IST

Farmers Protest: दिल्ली सरकारकडून 9 ऑगस्टपर्यंत दररोज 200 शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी

ठळक मुद्दे26 जानेवारीला लाल किल्यापर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आज (गुरूवार, 22 जुलै) दिल्लीत संसद मार्चची सुरुवात करत आहेत. दिल्लीतील जंतर-मंतरवर 'शेतकरी संसद'द्वारे केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारले जाईल. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आजपासून 9 ऑगस्टपर्यंत दररोज फक्त 200 शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगिले की, दररोज 200 शेतकऱ्यांचा एक समूह पोलिसांच्या सुरक्षेत सिंघू बॉर्डरवरुन जंतर-मंतरला येईल आणि सकाळी 11 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन करेल.

26 जानवारीला दिल्लीत झालेल्या तीव्र आंदोलनानंतरही दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी दिली आहे. ही परवानगी 22 जुलै पासून 9 ऑगस्टपर्यंत असेल. भारतीय किसान यूनियन (BKU) चे नेते राकेश टिकैत सिंघु बॉर्डरवरुन 200 शेतकऱ्यांसह जंतर-मंतरकडे रवाना झाले आहेत. जंतर-मंतरवर राकेश टिकैत शेतकरी संसदेचे आयोजन करतील आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनावरही लक्ष्य ठेवतील.

26 जानेवारीच्या ऱॅलीत झाली होती हिंसायावर्षी 26 जानेवारीला लाल किल्यापर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यादरम्यान आंदोलकांनी आंदोलनाला तीव्र रुप देत लाल किल्यात घुसून झेंडे फडकावले होते. तसेच, पोलिसांना मारहाणही झाली होती. त्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याची परवानगी दिली असली तरी, यावेळेस सुरक्षेची पुर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी जंतर-मंतरवर सुरक्षेची पूर्ण तयार केली आहे. तर दिल्ली पोलिस आणि अर्धसैनिक दलाच्या 5-5 तुकड्या जंतर-मंतरवर तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. 

 

 

टॅग्स :delhiदिल्लीFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीBJPभाजपाAAPआप