शेतकरी मंडळाचे वर्चस्व
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:12+5:302015-03-20T22:40:12+5:30
बोधेगाव : सुळेपिंपळगाव व चेडेचांदगाव सेवा संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी मंडळाने तेरा जागा जिंकल्या. विजयी उमेदवार -श्रीकिसन कणसे, कल्याण गरड, आबासाहेब चेडे, शिवाजी चेडे, रमेश गोंधळी, चंद्रभान मरकड, बाबू ढाकणे, भीमा मासाळ, बाबू वाल्हेकर, गयाबाई भिसे, संदीप चेडे, दीपिका गरुड, विमल चेडे.

शेतकरी मंडळाचे वर्चस्व
ब धेगाव : सुळेपिंपळगाव व चेडेचांदगाव सेवा संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी मंडळाने तेरा जागा जिंकल्या. विजयी उमेदवार -श्रीकिसन कणसे, कल्याण गरड, आबासाहेब चेडे, शिवाजी चेडे, रमेश गोंधळी, चंद्रभान मरकड, बाबू ढाकणे, भीमा मासाळ, बाबू वाल्हेकर, गयाबाई भिसे, संदीप चेडे, दीपिका गरुड, विमल चेडे.देठे यांची निवडसुपा : पुणेवाडी ता. पारनेर येथील शरद देठे यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकपदी निवड झाली. हरिनाम सप्ताहढोरजळगाव : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे २१ ते २७ मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहात रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २७ रोजी सकाळी नऊ वाजता हभप बाबासाहेब महाराज आनंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.दातीर यांचा सत्कारटाकळीढोकेश्वर : ग्रामसेवक संघटनेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी संपतराव दातीर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा राज्य ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी सत्कार केला. यावेळी ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक सुनील नागरे, जिल्हा संघटक युवराज डेरे हजर होते.खंडोबामाळ शाळेचे यशपाथर्डी : येथील खंडोबामाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. जिल्हा गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थी व तालुका गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थी आले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तुषार तुपे, शिक्षिका गिता खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.आरोग्य तपासणी मोहीमश्रीगोंदा : तालुक्यातील लिंपणगाव परिसरात आरोग्य विभागाच्यावतीने घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. लुकडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक ही मोहीम राबवित आहेत.पिकांची पाहणीभाळवणी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण परिसरातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल घनवट, पारनेर तालुका उपाध्यक्ष वसंत साठे यांनी पाहणी केली. शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच शेतकर्यांचे रब्बीचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी घनवट यांनी केली.गायी ठारघोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी विद्यालयानजीक अज्ञात वाहन धडकेने पाच मोकाट गायींचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर चालक वाहनासह पसार झाला.