विजेच्या धक्क्याने शेतकर्याचा मृत्यू
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:37+5:302015-09-07T23:27:37+5:30
कार्हाटी : जळगाव सुपे येथे विजेच्या धक्क्याने भाऊसाहेब शिवाजी जगताप (वय ४२) या शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विजेच्या धक्क्याने शेतकर्याचा मृत्यू
क र्हाटी : जळगाव सुपे येथे विजेच्या धक्क्याने भाऊसाहेब शिवाजी जगताप (वय ४२) या शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.जळगाव सुपे (ता. बारामती) येथे रविवारी (दि. ६) दुपारी गाईंना पाणी पाजण्यासाठी विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी जगताप गेले होते. या वेळी विजेचा धक्का बसल्याने जगताप यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. ०००००