अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
By Admin | Updated: March 18, 2015 23:43 IST2015-03-18T23:43:10+5:302015-03-18T23:43:10+5:30
अवकाळी पावसामुळे देशात विविध भागांत शेती पिकांच्या नुकसानीवर राज्यसभेत बुधवारी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे देशात विविध भागांत शेती पिकांच्या नुकसानीवर राज्यसभेत बुधवारी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी सदस्यांनी यावेळी केली.
शून्यप्रहरादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, जनता दल (युनायटेड)चे शरद यादव, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव आणि काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री आदींनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात तसेच अन्य काही राज्यांत गहू आणि बागायती पिकांचे अवकाळीने प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकार एकट्याने शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही. यामुळे केंद्र सरकारने त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असे शरद पवार म्हणाले. शरद यादव यांनी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला.
शिवसेनेची मागणी
अंदमानस्थित सेल्यूर तुरुंगात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा हटवण्यात आलेला स्मृतिफलक पुन्हा लावण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका सदस्याने बुधवारी लोकसभेत केली. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
मी अंदमानच्या तुरुंगात गेलो होतो. या ठिकाणी सावरकरांच्या सन्मानार्थ एक स्मृतिफलक लावण्यात आला होता. नंतर तो हटवण्यात आला. रालोआ सरकारने तो पुन्हा लावण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप तो लावला गेलेला नाही, असे सावंत म्हणाले.
४देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा मृत्यूदिन ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न ही अत्यंत गंभीर बाब असून माजी पंतप्रधानांच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण कदापि होऊ देणार नाही, अशी ग्वाही बुधवारी केंद्र सरकारतर्फे संसदेत देण्यात आली.
४संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (एसजीपीसी) एक कॅलेंडर प्रसिद्ध केले असून यात इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा उल्लेख शहीद असा केला. याप्रकरणी सरकारने उत्तर देण्याची मागणी या सदस्यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढणार?
४गरज भासल्यास संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवस वाढविण्याचा विचार सरकारने चालवला आहे. कोळसा, खाण व खनन ही दोन महत्त्वपूर्ण सुधारणाविषयक विधेयके पारित करण्यासाठी येत्या २३ आणि २४ मार्चलाही संसदेची बैठक होण्याची शक्यता आहे.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना डिवचणारे वादग्रस्त वक्तव्य करणारे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी बुधवारी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. स्मृती इराणींचा मी आदर करतो, असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
गत आठवड्यात राज्यसभेतील एका चर्चेदरम्यान यादव यांनी दाक्षिणात्य महिलांच्या वर्णावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
मला आदरच...
मी दिलगिरी व्यक्त करतो. मला स्मृती इराणींबद्दल आदरच आहे. यापूर्वी इराणींच्या शैक्षणिक पात्रतेबाबतचा वाद झाला होता, त्यावेळी त्यांचा बचाव करणारा मी पहिला व्यक्ती होतो, असे यादव म्हणाले.