शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आंदाेलनातील शेतकरी भांगडा-डीजेवर धरणार ठेका, लढ्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 04:05 IST

Farmer Protest : या काळात शेतकऱ्यांचे मनाेधैर्य खचू नये यासाठी आता काही तरुण शेतकऱ्यांनी वाहनांवर डीजे संगीत सिस्टम बसविली आहे. आंदाेलनाला पंजाबी संगीताची जाेड मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होणार आहे. 

 नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याविराेधात गेल्या दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे तीव्र आंदाेलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रदीर्घ आंदोलनाची तयारी चालविली आहे. या काळात शेतकऱ्यांचे मनाेधैर्य खचू नये यासाठी आता काही तरुण शेतकऱ्यांनी वाहनांवर डीजे संगीत सिस्टम बसविली आहे. आंदाेलनाला पंजाबी संगीताची जाेड मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होणार आहे. दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेला लढा किती दिवस सुरू राहील, याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी काही महिन्यांचा धान्य पुरवठा साेबत आणला आहे. लंगर भाेजनाच्या पंगती महामार्गावर बसलेल्या दिसत आहेत. आता मनाेरंजनाची जाेड आंदाेलनाला मिळाली आहे. सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याने रिकाम्या ट्रॅक्टरवर डीजे यंत्रणा बसविली. एखाद्या वरातीमध्ये शाेभून दिसेल अशा पद्धतीने त्याने ट्रॅक्टर सजविलेले आहे. डीजेवर पंजाबी गाण्यांसह हरयाणवी संगीत वाजविले जात असून, शेतकऱ्यांनी भांगडा नृत्य करून आनंद लुटला.  

ब्रिटनच्या ३६ खासदारांचे शेतकरी आंदाेलनाला समर्थन लंडन : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविराेधात शेतकऱ्यांनी माेठे आंदाेलन सुरू केले आहे. त्यास ब्रिटनच्या ३६ खासदारांनीही पाठिंबा दिला आहे. ब्रिटिश सरकारने नरेंद्र माेदी सरकारसाेबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासंदर्भात पत्रही लिहिले आहे. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनीही सहानुभूती व्यक्त करतानाच लाेकांना शांततापूर्ण मार्गाने आंदाेलनाचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनमध्ये शीख समुदाय माेठ्या प्रमाणात आहे. या समुदायातील खासदारांनी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डाॅमिनिक राब यांना पत्र लिहून माेदी सरकारसाेबत चर्चा करण्याची विनंती केली आहे.  पाठिंब्याचा पुनरुच्चारकॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडाे यांनी कॅनडा शेतकऱ्यांना पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आहे. भारताने तीव्र नाराजी व्यक्त करून द्विपक्षीय संबंध बिघडतील, असा इशारा दिला हाेता. तरीही ट्रुडाे वक्तव्यावर ठाम आहेत. सरकारने चर्चा सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्ली