शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शेतकरी आक्रमक, यूपी गेटवर हजारो जाट, गाझीपूर सीमेवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:12 IST

Farmers Protest : नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत.

- विकास झाडे

नवी दिल्ली : आंदोलनाच्या ३० व्या दिवशी शेतकरी पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सर्वच सीमांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून शुक्रवारी यूपी गेटवर आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येत जाट शेतकरी पोहोचले. कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली.नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत. कायदे मागे घ्यावे म्हणून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने आंदोलन केव्हाही उग्र रूप धारण करू शकते, अशी शक्यता असल्याने सर्वच सीमांवर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली. आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या सूचना विविध राज्यांतील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सिंघू सीमेवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आधी गोदाम नंतरकायदे -टिकेतमुरादाबाद येथील इकरोटिया टोल प्लाझावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी हे कायदे केवळ उद्योगपतींच्या सेवेसाठी मोदींनी बनविले आहेत. हे उद्योगपती धान्यांची साठेबाजी करण्यासाठी आधी गोदामे उभारतात. त्यानंतर हे कायदे शेतकऱ्यांवर लादले जातात, यातूनच मोदींची नीती स्पष्ट होते, अशी टीका केली. 

कायद्याचा एकतरी फायदा सांगा - केजरीवालदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करीत केंद्र सरकारला या कायद्याचे फायदे विचारले. एक तरी फायदा सांगावा असे त्यांनी आवाहन केले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ नुकसानच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मंत्री व खासदारांना पत्रमंत्री आणि खासदारांना पत्र लिहून हा कायदा मागे घेण्यात यावा, अशी विनंती शेतकरी संघटना करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाने हा निर्णय घेतला.

अदानी-अंबानीच्या मानसिकतेतून बाहेर पडावेमहाराष्ट्रातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिल्ली येथे चाललेल्या शेतकरी आंदोलनावर टीका करीत शेतकरी खात असलेल्या अक्रोड, पिस्ता यावर भाष्य केले आहे. त्यावर संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील आणि राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला. पाटील म्हणाले, अक्रोड, पिस्ता, बदाम, काजू, बेदाणा, केसर हेदेखील शेतकरीच पिकवतो. हे शेतकऱ्यांनी खाऊ नये अशा पद्धतीने मत व्यक्त करून दरेकर यांनी आपल्या बालबुद्धीचे प्रदर्शन केले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवावा. मात्र, स्वत: उपाशी राहावे, असे भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर ते त्यांच्या विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. भाजप सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने हे कायदे तातडीने रद्द करावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकरी आंदोलनावर टीका करून आंदोलन कमकुवत करता येणार नाही. उलट ते आणखी मजबूत होईल. शेतकऱ्यांनी पिकवावे व अदानी-अंबानीने खावे या मानसिकतेतून भाजपने बाहेर पडणे आवश्यक आहे. 

दिल्ली- जयपूर मार्ग जामआंदोलनाच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी शुक्रवारी दिल्ली- जयपूर मार्गावरील रेवाडी येथे उतरले. राष्ट्रीय महामार्गावर जाम लागला आहे. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे आहे; परंतु हरयाणा पोलिसांनी त्यांना अडवले असल्याने शेतकऱ्यांनी जागेवरच धरणे दिलेत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्ली