शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण; आता 'संसद मार्च'बद्दल शेतकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 14:08 IST

शेतकरी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी संसद भवनाला घेराव घालणार असल्याची घोषणा याआधीच केली होती.

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांकडूनही आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी संसद भवनाला घेराव घालणार असल्याची घोषणा केली होती. पण सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून 'संसद मार्च' रद्द केला जाण्याची शक्यता आहे.

१ फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याच दिवशी संसदेपर्यंत मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली होती. पण प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर संसद मार्च रद्द करण्याबाबतचा मोठा निर्णय शेतकरी संघटना घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

अमित शहा इन ऍक्शन! गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; पुढील काही तास महत्त्वाचे

दिल्लीत काल झालेल्या हिंसाचारात सरकारी मालमत्तेचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. तर ३०० दिल्ली पोलीस जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेबाबत शेतकरी आंदोलकांच्या प्रतिनिधींची बैठक आता दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. 

प्रजासत्ताक दिनी दिल्ली पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाचं उल्लंघन करत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर लाल किल्ल्यापर्यंत पोहोचल्याने शेतकरी संघटनांचे नेते आता 'संसद मार्च'साठी संभ्रमात सापडले आहेत. त्यात कालच्या घटनेवर केंद्र सरकारही मोठी कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येत्या काही तासांत शेतकरी आंदोलनाबाबत मोठ्या घडामोडी राजधानी दिल्लीत घडताना दिसतील. खळबळजनक! "काठ्या घेऊन रॅलीत या"; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरल

दिल्लीतील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन डझनपेक्षाही अधिक एफआयआर दाखल केले आहेत. तर दोनशेहून अधिक जणांना अटक केली आहे. प्रजासत्ताक दिनी हिंसाचार भडकलेल्या भागांत पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी गृह मंत्रालयाला दिलेल्या माहितीनंतर हे पाऊल उचलण्यात आलं. काल हिंसाचार उफाळलेल्या भागातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली