शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

Rakesh Tikait : "असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक, समाजात फूट पाडण्याचं करताहेत काम"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 9:07 AM

Rakesh Tikait And Asaduddin Owaisi : राकेश टिकैत यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आले. केंद्राने हे कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर शेतकरी आंदोलन संपवून माघारी परतले आहेत. पण असं असताना आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन सुरू होऊ शकतं, असा सूचक इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला आहे. तसेच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक आहेत" असं म्हटलं आहे. 

राकेश टिकैत यांनी सरकारने सध्या फक्त तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. उर्वरित मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. आश्वासनांची पूर्तता न केल्यास पुन्हा आंदोलन होऊ शकतं असं म्हटलं आहे. यासोबतच असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "केंद्र सरकारने सध्या केवळ तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. मात्र त्यांनी एमएसपी बाबत कायदा केलेला नाही. समिती स्थापन करण्याबाबत सरकार निश्चितपणे बोलले आहे, पण सरकार अतिशय संथ गतीने काम करत आहे. आमची आश्वासने पूर्ण न झाल्यास शेतकरी पुन्हा आंदोलन करू शकतात" असं म्हटलं आहे. 

"ओवेसींसारख्या लोकांपासून जनतेने सावध राहावं" 

"ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक असून समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत. ओवेसींसारख्या लोकांपासून जनतेने सावध राहावं" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता संयुक्त किसान मोर्चाची काय भूमिका असेल? तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राकेश टिकैत आताही विविध राज्यांमध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: राकेश टिकैत यांनी दिली आहेत. काही दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली होती. 

"सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू"

"जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू. तसेच मी उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जाणार आहे. मला कुणीही अडवू शकत नाही.  टिकैत पुढे म्हणाले की, आंदोलन यशस्वी ठरल्याचे समाधान चेहऱ्यावर आहे. एक समाधानाची भावना आहे, ही एकप्रकारे विजय यात्राच आहे. आता सरकारशी करार झाला आहे. सरकारबाबत कुठलीही कटुता आमच्या मनात नाही. मात्र पुढे काय निर्णय घेतले जातील, हे येणारा काळच ठरवेल. आता शेतकऱ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने राहावे आणि शेतीवर लक्ष द्यावे" असे आवाहन राकेश टिकैत यांनी केले आहे.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीFarmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपा