शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नेते डल्लेवाल यांची प्रकृती खालावली; तीन आठवड्यांत दोन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:20 IST

अकरा महिन्यांपासून सुरू आहे आंदोलन

पटियाला: हरयाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. तीन आठवड्यांत आंदोलनस्थळी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना असल्याची माहिती गुरुवारी शेतकरी नेत्यांनी दिली. यापूर्वी १८ डिसेंबर रोजी शंभू सीमेवर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.

आंदोलनस्थळी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव रेशम सिंग असून, ते तरणतारण जिल्ह्यातील पाहुविंड येथील रहिवासी आहेत. रेशम सिंग यांनी विष सेवन केल्याचे समजल्यानंतर त्यांना उपचारासाठी पटियाला येथील राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार चर्चा करत नसल्यामुळे रेशम सिंग नाराज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले.

अकरा महिन्यांपासून सुरू आहे आंदोलन

  • तीन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेत शेतीमालाला एमएसपी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने हे आश्वासन पूर्ण केले नाही.
  • त्यामुळे १३ फेब्रुवारी २०२४ पासून पंजाब व हरयाणाच्या शेतकऱ्यांनी शंभू व खानौरी सीमेवर सुरू केलेल्या आंदोलनाला अकरा महिने पूर्ण होत आहेत.

शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांचे २६ नोव्हेंबरपासून खानौरी सीमेवर आमरण उपोषण सुरू आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून उपोषण सुरू असल्याने डल्लेवाल यांची प्रकृती जास्त बिघडली आहे. डल्लेवाल यांची प्रकृती खालावत चालल्याने रेशम सिंग व्यथित झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपHealthआरोग्य