शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकरी मृत्यू निवडणूक प्रचाराचा मुद्दा होतो, मग शहीद जवानांचा का नाही?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:28 IST

देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे तेवढाच देशभक्ती आणि शहीदांचे बलिदान निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शहीद जवांनाचा उल्लेख करुन मत मागितल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला जातो. या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत विरोधकांना प्रतिप्रश्न केला आहे. देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे तेवढाच देशभक्ती आणि शहीदांचे बलिदान निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं. 

या मुलाखतीत मोदी म्हणाले की, मागील ४० वर्षापासून देश दहशतवादाशी लढतोय. जर देशातील लोकांसमोर जर आम्ही सांगितले नाही देशातील दहशतवादावर आमचे विचार काय आहेत तर त्याला अर्थ काय राहणार? कोणताही देश देशभक्तीच्या भावनेशिवाय पुढे जाऊ शकतो का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला आहे. 

हजारो भारतीय जवान देशासाठी शहीद होतात, मग हा मुद्दा निवडणुकीत का नको? जेव्हा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तो मुद्दा निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनतो मग जेव्हा एक जवान देशासाठी शहीद होतो तर तो निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही? असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना तुमचं पहिलं मत हे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना समर्पित करा असं आवाहन जाहीर व्यासपीठावरुन केलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आरोप केला होता. शहीद जवानांच्या नावाचा वापर पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करुन याचं राजकारण करत असल्याचा आरोप केला जात होता त्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे. 

वीर जवान, पुलवामातील शहिदांसाठी मतदान करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरमध्ये भाषण करताना नवीन मतदारांना केलेल्या आवाहनावर विरोधी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडूनही पंतप्रधानांच्या भाषणाचा व्हिडीओ तपासला जात असून प्रथमदर्शनी नरेंद्र मोदी यांनी केलेलं वक्तव्य हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करताना दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारात भारतीय सैन्य दलाचा वापर करण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबाबत केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं? हे पाहणे गरजेचे आहे.    

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीfarmer suicideशेतकरी आत्महत्याElectionनिवडणूक