दिल्लीत आपच्या रॅलीत शेतक-याने केली आत्महत्या

By Admin | Updated: April 22, 2015 15:33 IST2015-04-22T14:18:51+5:302015-04-22T15:33:03+5:30

भूसंपादन विधेयकाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरु असलेल्या आपच्या आंदोलनात एका शेतक-याने झाडावर गळफास घेत आत्महत्या केली.

A farmer committed suicide at his rally in Delhi | दिल्लीत आपच्या रॅलीत शेतक-याने केली आत्महत्या

दिल्लीत आपच्या रॅलीत शेतक-याने केली आत्महत्या

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २२ - भूसंपादन विधेयकाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरु असलेल्या आपच्या आंदोलनात एका शेतक-याने झाडावर गळफास घेत सर्वांसमक्ष आत्महत्या केली. दुर्दैवी बाब म्हणजे हा शेतकरी झाडावर चढल्यावर एकानेही त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने गळफास घेतल्यावर उपस्थितांना जाग आली व तिघा जणांनी झाडावर चढून त्याला खाली उतरवले मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

भूसंपादन विधेयकाविरोधात बुधवारी आम आदमी पक्षातर्फे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात राजस्थानचे गजेंद्र सिंह हे शेतकरीही आले होते. दुपारी दिडच्या सुमारास गजेंद्र सिंह हे झाडावर चढले व त्यांनी आत्महत्येची धमकी द्यायला सुरुवात केली.  आप नेते कुमार विश्वास यांनी मंचावरुन संबंधीत व्यक्तीला खाली उतरण्याची विनंती केली. मात्र त्यांनी कुमार विश्वास यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत गळफास घेतला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी तिघांनी झाडावर चढून गजेंद्रसिंह यांना खाली उतरवत दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गजेंद्रसिंह यांची प्राणज्योत मावळली होती. 

...घरी परत कसा जाऊ

गजेंद्रसिंह हे राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील रहिवासी असून अवकाळी पावसाने त्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. आत्महत्येपूर्वी गजेंद्रसिंह यांनी एक चिठ्ठी खाली फेकली होती. या चिठ्ठीत त्यांनी लिहीले होते,  'मला तीन लहान मुली आहेत,  अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले असून वडिलांनी मला घरातून काढून दिले आहे. आता मी घरा कसा जाऊ, मी बेहाल झालो असून मित्रांनो मला पर्याय सुचवा.' मदत मागणा-या गजेंद्रसिंह यांनी थेट आत्महत्येचा पर्याय निवडून गळफास घेतला. 

Web Title: A farmer committed suicide at his rally in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.