हरियाणामधील फरीदाबाद येथे मोठा अपघात घडला आहे. येथे आयोजित प्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात एक मोठा झुला अचानक तुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. झुला तुटला तेव्हा त्याच्या भोवती मोठी गर्दी होती. यामुळे या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बचावकार्य करत असताना एक पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्हा उपायुक्त आयुष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण १३ जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा झुला तुटला, तेव्हा परिसरात एकच आरडाओरड आणि पळापळ सुरू झाली. लोक प्रचंड भयभीत झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कर्याला सुरुवात झाली. या प्रक्रियेत एक पोलीस निरीक्षक आणि इतर सहा जण गंभीर जखमी झाले, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातामुळे मेळ्याच्या सुरक्षिततेसंदर्भात मोठे प्रश्नचिन्ह -घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा उपायुक्त, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने संबंधित परिसराला बॅरिकेडिंग केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मेळ्याच्या सुरक्षिततेसंदर्भात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तत्पूर्वी, फूड कोर्टमध्ये जोरदार वाऱ्याने गेट पडल्याची घटना घडली होती. वारंवार होत असलेल्या अशा दुर्घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, झुल्यांच्या संचालकांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
Web Summary : A major accident at Surajkund Mela in Faridabad saw a swing collapse, injuring thirteen and killing a police officer during rescue efforts. Concerns rise over fair safety after the incident and a prior food court accident. Investigation ordered.
Web Summary : फरीदाबाद के सूरजकुंड मेले में झूला टूटने से बड़ा हादसा हुआ, जिसमें तेरह लोग घायल हो गए और बचाव कार्य के दौरान एक पुलिस अधिकारी की मौत हो गई। घटना और पहले फूड कोर्ट हादसे के बाद मेले की सुरक्षा पर चिंता जताई जा रही है। जांच के आदेश दिए गए हैं।