शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप, राऊतांसह महाराष्ट्रातील 8 जणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 07:13 IST

सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

नवी दिल्ली : एरवी एकमेकांवर आरोप करणाऱ्या विविध पक्षांच्या सदस्यांनी राजकीय मतभेद विसरून संसदीय परंपरा अधिक दृढ करण्यासाठी सत्तारूढ व विरोधकांच्या योगदानाच्या भूमिकेचे समर्थन केले. गुरुवारी राज्यसभेचे कोणतेही इतर कामकाज न होता सदस्यांना निरोप देण्यात आला. येत्या तीन महिन्यांत राज्यसभेतून ७२ सदस्य निवृत्त होत आहे. यात महाराष्ट्रातील आठ सदस्यांचा समावेश आहे.

सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भाषण करताना ते एकदा भावुकही झाले होते. सर्वच पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांबद्दल प्रेम, आदर व सद्भावना व्यक्त केली. संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या भूमिकेचे महत्त्वही अधोरेखित केले.  यावेळी भाषण करताना मावळते सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी राजकारण आपण लोकनीतीसारखे केल्याचा उल्लेख केला. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी संसदीय कामकाजात सुधारण्याच्या सूचना केल्या. 

छत्रपती संभाजी व डॉ. सहस्रबुद्धेंचा गौरवसभापती एम. वेंकय्या नायडू यांनी छत्रपती संभाजीराजे व डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या सखोल व अभ्यासपूर्ण योगदानाचा विशेष उल्लेख केला.

महाराष्ट्रातील सदस्यकेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, शिवसेनेचे नेते संजय राऊत तसेच राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित झालेले छत्रपती संभाजीराजे व डॉ. नरेंद्र जाधवसुद्धा निवृत्त होत आहेत. यावेळी बोलताना सभागृहाचे नेते पीयूष गोयल यांनी विरोधकांच्या भूमिकेचेही समर्थन केले.

ज्ञानापेक्षाही अनुभवी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे -मोदी‘राज्यसभेत असलेल्या अनेक सदस्यांकडे संसदीय कामाचा मोठा अनुभव आहे. अनेकदा ज्ञानापेक्षा व्यक्तीचा अनुभव समाजाचे जीवन समृद्ध करण्यात मोठी भूमिका बजावतात. संसदीय प्रणाली शाबूत राखण्यात या अनुभवाचे निश्चित मोठे योगदान आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केले.  राज्यसभेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ७२ सदस्य निवृत्त होत आहेत. या सर्व सदस्यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ज्ञानाचे महत्त्व मर्यादित आहे. ते चर्चासत्रात कामी येते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतRajya Sabhaराज्यसभाMember of parliamentखासदार