सागरपार्कच्या हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घ्या फेरीवाला समिती बैठक : पर्याय मिळेपर्यंत सागरपार्कवरच व्यवसाय करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 21:37 IST
जळगाव: शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सागरपार्कवरील हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घ्यावा. त्यांना पर्यायी जागा निश्चित होईपर्यंत सागरपार्कवरच व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी हॉकर्सतर्फे करण्यात आली. त्यावर गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले.
सागरपार्कच्या हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घ्या फेरीवाला समिती बैठक : पर्याय मिळेपर्यंत सागरपार्कवरच व्यवसाय करून देण्याची मागणी
जळगाव: शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सागरपार्कवरील हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घ्यावा. त्यांना पर्यायी जागा निश्चित होईपर्यंत सागरपार्कवरच व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी हॉकर्सतर्फे करण्यात आली. त्यावर गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनीदेखील ६० दिवसांपासून हॉकर्सचा व्यवसाय बंद आहे. या हॉकर्सच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने तातडीने हा विषय मार्गी लावावा, त्यांना पर्याय द्यावा. त्यांनी ५ पर्याय दिले आहेत. त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. उपमहापौरांनी तातडीने निर्णय घेऊन कळवितो, असे आश्वासन हॉकर्सला दिले. मनपाच्या जागेची मागणीयावेळी भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी गोलाणीत सुविधा नाहीत. तेथे जाणार नाही. त्याऐवजी जुनी नपाच्या जागेवर बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. फुले मार्केट हॉकर्स प्रतिनिधींनीही तशीच मागणी केली. मात्र उपमहापौर सुनील महाजन यांनी अशारितीने जागा देता येणार नाही. मनपाला त्यावर काही बांधकाम करावयाचे असल्याच अडचण येईल, असे सांगितले. त्यावर मनपाने खाली जागा द्यावी. वर मजले बांधले तरी चालतील, असे मत मांडले. त्यावर अनंत जोशी यांनी तेथे तळमजला चालेल तर तयार असलेले गोलाणीतील ओटे का नको? असा सवाल केला. कालमर्यादा ठरवाॲड.सुरज जहाँगीर यांनी फेरीवाला धोरण व रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय परस्पर विरोधी नाही. जनतेची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. असे मत मांडले. तर रोटरीचे अनंत भोळे यांनी या कार्यवाहीसाठी कालमर्यादा निित करण्याची सूचना केली. त्यावर अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांनी ११ पर्यायी जागांचे नकाशे जवळपास तयार असून पाच-सहा दिवसांत ते हॉकर्सना पाहण्यासाठी उपलब्ध असतील, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी दहा-पंधरा दिवसांत याबाबत अंतिम प्रस्ताव महासभेपुढे ठेवू असे स्पष्ट केले. बैठकीला हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष सुनील सोनार, सुनील जाधव, चंद्रकांत चौधरी, मोहन तिवारी, दिनेश हिंगणे, फुले मार्केट संघटनेचे नंदू पाटील, फारूक अहेलवाल, सावित्रीबाई भाजीपाला संस्थेचे प्रभाकर तायडे, राजेंद्र वाणी, रवी महाजन, राजेंद्र चौधरी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते. ----इन्फो----सणांच्या बाजारासाठीही पर्यायखाविआचे गटनेते गणेश सोनवणे यांनी पोळ्यापासून विविध सणांसाठी बाजार भरतो. त्यामुळे रस्त्यावर कोंडी होते. नियमित हॉकर्सला हटविले तरीही हा बाजार तेथे भरेल. त्यामुळे या बाजारासाठीही पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. ----इन्फो----उपमहापौरांच्या आवाहनास प्रतिसादउपमहापौर सुनील महाजन यांनी शहरात ९ ते १२ दरम्यान महाआरोग्य शिबिर असून त्यासाठी बाहेरील डॉक्टरमंडळी तसेच मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार येत असल्याने शहर स्वच्छ व सुंदर दिसेल, अशा रितीने परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेने हॉकर्सला स्वच्छता राखण्याचे आवाहन निवेदनाद्वरे केले आहे.----इन्फो----हॉकर्स संघटनेचे आवाहनशहरातील सर्व हॉकर्सनी फेरीवाला धोरणाच्या नियमानुसार ३ बाय ५ फूट जागेतच भाजीपाला टोपल्या ठेवाव्यात. टोपल्यांची संख्या कमी करा. लोखंडी पेट्या ठेवू नका. जास्त प्रमाणात माल साठवू नका, व्यवसाय झाल्यावर गाडी घरी घेऊन जा. वेळेचे बंधन पाळा, कचरा रस्त्यावर टाकू नका, आपल्या दुकानासमोर वाहतुकीला अडथळा होईल, अशा रितीने वाहन उभे करू देऊ नका, अंडापावच्या गाडीवर कुणी मद्यप्राशन करताना आढळल्यास त्याची नोंदणी रद्द केली जाईल. त्याची काळजी, घ्या, असे आवाहन केले आहे.