विधानसभेसाठी मतदार यादी प्रसिद्ध
By Admin | Updated: October 22, 2016 00:52 IST2016-10-22T00:52:38+5:302016-10-22T00:52:38+5:30
जळगाव : विधान परिषदेची निवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी २१ रोजी जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी निवडणूक शाखा, जिल्हा परिषद, मनपा, जिल्ातील सर्व नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आहे. मतदार यादीवर दावे किंवा हरकती दाखल करावयाच्या असल्यास त्यांनी २७ ऑक्टोबरपर्यंत लेखी स्वरूपात दाखल कराव्या असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

विधानसभेसाठी मतदार यादी प्रसिद्ध
ज गाव : विधान परिषदेची निवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी २१ रोजी जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी निवडणूक शाखा, जिल्हा परिषद, मनपा, जिल्ातील सर्व नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आहे. मतदार यादीवर दावे किंवा हरकती दाखल करावयाच्या असल्यास त्यांनी २७ ऑक्टोबरपर्यंत लेखी स्वरूपात दाखल कराव्या असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले आहे.शिरसोलीच्या शेतकर्यांतर्फे कृषी राज्यमंत्र्यांना साकडेजळगाव : शिरसोली येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विजय आंबटकर व लक्ष्मण काळे यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना चिंचोली येथील शेतकरी मेळाव्यात निवेदन दिले. यावेळी कापसाला चांगला भाव देऊन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.भूसंपादनाच्या अंतिम निवाड्याची रक्कम द्याजळगाव : पारोळा तालुक्यातील मौजे शिरसमणी, भोंडण व पोपटनगर येथील शेतकर्यांना अंतिम निवाडा मंजूर करून रक्कम मिळावी या आशयाचे निवेदन गुलाब शिवराम पाटील, अजबराव भिमराव पाटील यांच्यासह शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे. अन्यथा २८ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व सामुहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.सुप्रिम कॉलनीमध्ये सप्ताहाचा समारोपजळगाव : सुप्रिम कॉलनीतील विठ्ठल रुखमाई व तुळजाभवानी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप हभप गोविंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे, मनपा आयुक्त जीवन सोनवणे उपस्थित होते.यशस्वीतेसाठी बाळासाहेब सोनवणे, आर.एस.पाटील, दिलीप सोनवणे, किसन सुन्ने, विलास मगर, आसाराम निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.