प्रसिद्ध मेंडोलिन वादक श्रीनिवास यांचे निधन

By Admin | Updated: September 20, 2014 02:55 IST2014-09-20T02:55:12+5:302014-09-20T02:55:12+5:30

संगीतजगतात मेंडोलिन वादनाला नव्या उंचीवर नेणा:या उप्पलपु श्रीनिवास यांचे चेन्नईमधील एका रुग्णालयात शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

The famous Mandolin player Srinivas passed away | प्रसिद्ध मेंडोलिन वादक श्रीनिवास यांचे निधन

प्रसिद्ध मेंडोलिन वादक श्रीनिवास यांचे निधन

चेन्नई : संगीतजगतात मेंडोलिन वादनाला नव्या उंचीवर नेणा:या उप्पलपु श्रीनिवास यांचे चेन्नईमधील एका रुग्णालयात शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 45 वर्षाचे होते. गेल्या काही काळापासून त्यांना यकृताच्या आजाराने ग्रासले होते. त्यांना सारंगी श्रीनिवास असेही संबोधले जात होते. 
दक्षिण भारतीय कर्नाटक शैलीचे ते प्रसिद्ध मेंडोलिन वादक होते. त्यांनी जागतिक कीर्तीच्या अनेक कलावंतांसोबत काम केले. ज्यात जॉन मॅक्लाफ्लिन व मायकेल नीमन यांचा समावेश आहे. श्रीनिवास यांना 1998मध्ये पद्मश्री व 2क्1क्मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 
संगीतकार ए.आर. रहमान यांनी मेंडोलिन वादक श्रीनिवास यांच्या निधनामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे.
यू श्रीनिवास यांनी संगीत क्षेत्रत मेंडोलिन वादक म्हणून दीर्घकाळ योगदान दिले आहे. त्यांच्या समर्पण व योगदानाला संगीत क्षेत्र नेहमीच स्मरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले. श्रीनिवास यांनी मेंडोलिन वादनाला लोकमान्यता मिळवून दिली आहे.

 

Web Title: The famous Mandolin player Srinivas passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.