एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया

By Admin | Updated: March 5, 2015 17:56 IST2015-03-05T17:37:18+5:302015-03-05T17:56:46+5:30

एका तासात तब्बल २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया एका डॉक्टरने केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे आदेश मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी दिले आहेत

Family planning surgery for 27 women in one hour | एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया

एका तासात २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया

>ऑनलाइन लोकमत
इलाहबाद, दि. ५ -  एका तासात तब्बल २७ महिलांवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया एका डॉक्टरने केली आहे. 
या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे आदेश मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी दिले आहेत. चंदौली येथील एका प्रथम उपचार केंद्रावर सोयी सुविधांची कमतरता असताना या डॉक्टरने ही शस्त्रक्रिया केली असून या प्रथम उपचार केंद्रात रुग्णांना झोपण्याचीही व्यवस्था नसल्याने त्यांना जमीनीवरच झोपवावे लागल्याचेही उघड झाले आहे. ही शस्त्रक्रिया करते वेळी आणखी एक डॉक्टर हजर असल्याचे सांगितले जात आहे. परंतू, योग्य तपशील हातात लागल्यावर अधिक भाष्य करणे सोयीस्कर असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आर.एन सिंग यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दंडाधिकारी एन.के.सिंग यांनी मुख्य वैद्यकीय अधिका-यांना दिले आहेत. 

Web Title: Family planning surgery for 27 women in one hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.