शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भीती, अंधश्रद्धा झुगारत दिल्लीतील 'त्या' घरात राहायला आले कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 17:43 IST

बुराडी येथील याच घरात 1 जुलै 2011 रोजी एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते.

नवी दिल्ली - सुमारे दीड वर्षापूर्वी दिल्लीतील बुराडी परिसरातील एका घरात एकाच कुटुंबातील 11 जणांनी रहस्यमयरीत्या आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून या घराकडे स्थानिक लोक भीतीच्या नजरेने पाहत होते. तसेच या घराबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र या घराबाबत वाटणारी भीती आणि अंधश्रद्धांना झुगारत येथे एक कुटुंब वास्तव्यास आले आहे. मोहन कश्यप असे या कुटुंबातील कुटुंबप्रमुखांचे नाव असून, त्यांनी आपण भूतप्रेत, अंधविश्वास मानत नसल्याचे सांगितले. मोहन कश्यप यांनी येथे डायग्नॉस्टिक सेंटर उघडले असून, आज तेथे पूजाविधी करून कामसुद्धा सुरू केले आहे. बुराडीमधील हे घर आणि त्याविषयी पसरलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मोहन कश्यप म्हणाले की, ''मी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही. जर अशा गोष्टींवर माझा विश्वास असता तर मी येथे आलोच नसतो. मात्र आपल्याकडे कुठल्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी लक्ष्मी-गणेश यांची पूजा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे मीसुद्धा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पूजा केली.''  

दरम्यान, येथे राहणारे कुटुंब खूप चांगले होते. त्यांच्या घरात कुठलाही वाईट आत्मा राहत नाही. त्यांचा आत्मा थेट स्वर्गात गेला आहे, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. बुराडी येथील याच घरात 1 जुलै 2011 रोजी एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते. त्यापैकी 10 जणांचे मृतदेह फाशीला लटकलेले होते. तर एका वृद्धेचा मृतदेह बेडवर पडलेल्या अवस्थेत सापडला होता.  आता या घरात नव्यावे वास्तव्यास आलेले मोहन कश्यप हे घरातील तळमजल्यावर पॅथॉलॉजी लॅब बनवत आहेत. तर त्यांचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहणार आहे. दरम्यान, या घराची जबाबदारी सध्या त्या मृत कुटुंबाचे नातेवाईक घेत आहेत.  या घरात 11 कुटुंबीयांच्या झालेल्या रहस्यमयी मृत्यूसोबतच काही रहस्यमय गोष्टीही दिसून आल्या होत्या. त्यात घरातून निघालेल्या 11 पाईपांनी गुढ वाढवले होते. दरम्यान, नव्याने राहण्यास आलेल्या कुटुंबाने 11 पैकी काही पाईप बंद केले आहेत. तर काही उघडे ठेवणे आवश्य असल्याचे मोहन कश्यप यांनी सांगितले.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीBurari Deathsबुरारी मृत्यूFamilyपरिवार