शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाचा काँग्रेसशी संबंध, तुम्हाला आक्षेप तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 06:05 IST

न्या. गवईंनी दिला पारदर्शीपणाचा परिचय

सुनील चावके नवी दिल्ली : आपल्या कुटुंबाचा काँग्रेस पक्षाशी संबंध असल्यामुळे राहुल गांधी यांच्या याचिकेवरील सुनावणी आपल्या पीठासमोर होण्याविषयी कोणाला आक्षेप आहे का? अशी विचारणा करीत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्या पारदर्शीपणाचा परिचय घडविला. आपल्याविषयी कोणताही आक्षेप नाही, असे सांगत उभय पक्षांच्या ज्येष्ठ विधिज्ञांनी न्या. गवई यांच्या सचोटीवर मोहोर उमटविली. राहुल गांधी यांच्यावतीने विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी युक्तिवाद सुरू करण्यापूर्वीच न्या. गवई यांनी कर्तव्याची बाब म्हणून आपली बाजू स्पष्ट केली. आपले वडील स्व. रा. सु. गवई यांचे काँग्रेस पक्षाशी निकटचे संबंध होते. त्यांची अभिषेक मनू सिंघवी तसेच जेठमलानी यांच्या वडिलांशीही चांगली मैत्री होती, असे म्हटले.

...तर मी दूर राहण्यास तयारn आपण एका प्रकरणात महेश जेठमलानी यांचे वडील राम जेठमलानी यांचे कनिष्ठ सहकारी म्हणूनही काम केले आहे. आपले वडील काँग्रेसच्या समर्थनाने लोकसभेवर निवडून आले होते. आपले भाऊही काँग्रेस पक्षात आहेत. आपली काँग्रेसशी पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणावर प्रभाव पडेल, असे तुम्हाला वाटत असेल तर या प्रकरणापासून आपली दूर राहण्याची तयारी आहे. 

n आपल्या कारकीर्दीवर या राजकीय पार्श्वभूमीचा कोणताही प्रभाव पडलेला नाही. तरीही या प्रकरणात आपले वैयक्तिक मत वेगळे असू शकते, असे वाटून तुम्हाला आक्षेप असेल तर या प्रकरणाची सुनावणी माझ्यापुढे व्हावी की नाही, हे तुम्ही ठरवा, असे स्पष्टपणे नमूद करून न्या. गवई यांनी दोन्ही वकिलांचा सल्ला मागितला. त्यावर आपल्याला कोणताही आक्षेप नसल्याचे सिंघवी आणि जेठमलानी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Gandhiराहुल गांधी