शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

भेदरलेल्या त्या मुलीच्या कुटुंबीयांनी सोडले गाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 12:43 IST

जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संताप आणि निषेधाचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेनंतर भेदरलेले पीडित आसिफाचे कुटुंबीय...

श्रीनगर  - जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संताप आणि निषेधाचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेनंतर भेदरलेले पीडित मुलीचे कुटुंबीय  कथुआमधील रसाना हे आपले गाव सोडून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. बार असोसिएशनने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोध आणि संप पुकारल्याने आसिफाचे कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली होते.  प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार या मुलीचे वडील मोहम्मद युसूफ पुरवाला आपली पत्नी, दोन मुले आणि पाळीव प्राण्यांना घेऊन अज्ञात स्थळी गेले आहे. याआधी या मुलीचे कुटुंबीय पुढील महिन्यात काश्मीर सोडणार असल्याचे सांगण्यात येत होते.  दरम्यान, फुटीरतावादी हुर्रियत काँन्फ्रन्सचे नेते मीरवाईज उमर फारुख यांनी राज्यातील प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाकडे मुकाट पाहत आहेत, असा आरोप केला होता. तर जम्मू बार असोसिएशनने भीम सिंह यांच्या नेतृत्वाखालील पँथर्स पार्टीच्या मदतीने गुरुवारी बलात्कारी आणि आसिफाच्या खुन्यांना पाठिंबा देण्यासाठी शहरात बंद पुकारला होता.  कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षे वयाच्या बालिकेवरील बलात्कार हत्याप्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये वकील तसेच अन्य काही संघटना आंदोलने करीत असल्या, तरी झालेला अतिशय घृणास्पद होता आणि त्याचे समर्थन करताच येणार नाही, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.  बालिकेचे आठ वर्षे वयाच्या १० जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाली आहे, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. मारेक-यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू आहेत.ही मुलगी आपल्या घराजवळ घोड्यांना चारा देत असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. हे कारस्थान महसूल विभागातील निवृत्त अधिकारी सांजीराम याने रचले होते असे नमूद करून, आरोपपत्रात म्हटले आहे की, रस्साना गावातून बकरवाल जमातीच्या लोकांना हाकलून लावण्यासाठी सांझीराम प्रयत्नशील होता. बकरवालांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हे केले. त्यात त्याने भाच्यालाही सहभागी करून घेतले. या प्रकरणी  पोलिसांनी सांझीराम, त्याचा मुलगा विशाल जांगोरा, भाचा, भाच्याचा मित्र, पोलीस उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल, आणखी दोन पोलीस अधिकारी अशा आठ जणांना अटक केली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारJammu Kashmirजम्मू-काश्मीरcrimeगुन्हे