शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

खोटे बोलणाऱ्या सीतारामन यांनी राजीनामा द्यायला हवा- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 4:32 AM

राफेल विमानांच्या निर्मितीसंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीच्या क्षमतेबाबत खोटी विधाने करणाºया संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.

नवी दिल्ली : राफेल विमानांच्या निर्मितीसंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीच्या क्षमतेबाबत खोटी विधाने करणाºया संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. या प्रकरणात त्या दुसºयांदा खोटे बोलल्या आहेत, असाही आरोप त्यांनी केला. त्यास प्रत्युत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी हे ‘हास्यास्पद युवराज’ असल्याची टीका केली.‘राफेलमंत्री’ असा सीतारामन यांचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राफेल खरेदी व्यवहारातील घोटाळ्याचे समर्थन करण्याची कामगिरी त्यांच्याकडे आहे. राफेलची निर्मिती करण्याची हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी कंपनीकडे क्षमता नाही या त्यांच्या विधानातील खोटारडेपणा एचएएलचे माजी संचालक टी. सुवर्णा राजू यांनी दाखवून दिला आहे. एचएएलकडे राफेलचे उत्पादन करण्याची क्षमता नसल्याचा दावा राजू यांनी खोडून काढल्यानंतर राहुल गांधी यांनी सीतारामन यांचा राजीनामा मागितला आहे. मोदी सरकारने राफेल प्रकरणी केलेल्या करारामुळे देशाचे ४१ हजार कोटींचे नुकसान झाले. मित्र उद्योजकावर मेहेरनजर करण्यासाठी सरकारने या करारातून एचएएलला बाहेरचा रस्ता दाखविला, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधी