बनावट नोटांची तस्करी करणारा गजाआड

By Admin | Updated: August 25, 2015 22:23 IST2015-08-25T22:23:19+5:302015-08-25T22:23:19+5:30

बनावट नोटांची तस्करी करणारा गजाआड

False notes smuggler | बनावट नोटांची तस्करी करणारा गजाआड

बनावट नोटांची तस्करी करणारा गजाआड

ावट नोटांची तस्करी करणारा गजाआड
मुंबई: अंधेरीत बनावट नोटांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी दीड लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. यामध्ये एक मोठी टोळी सक्रीय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची तस्करी सुरु आहे. अशा प्रकारे बानावट नोटांची तस्करी करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर होती. सोमवारी कलिना गाव परिसरात एक इसम मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ८ च्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी एक पथक तयार केले. या पथकाने सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या तपासणीमध्ये त्याच्या बॅगेत एक हजार रुपयांच्या १६१ बनावट नोटा आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. तसेच त्याने या नोटा कोणाकडून आणल्या याचा देखील पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: False notes smuggler