फ्लॅग मीटिंगनंतर पुन्हा गोळीबार
By Admin | Updated: August 29, 2014 02:37 IST2014-08-29T02:37:54+5:302014-08-29T02:37:54+5:30
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व पाकिस्तान रेंजर्सदरम्यान आयोजित फ्लॅग मीटिंगच्या समाप्तीनंतर अवघ्या काही तासांतच पाकने अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार करून पुन्हा एकवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

फ्लॅग मीटिंगनंतर पुन्हा गोळीबार
जम्मू : दोन्ही देशांतील ताण कमी करण्याच्या हेतूने सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व पाकिस्तान रेंजर्सदरम्यान आयोजित फ्लॅग मीटिंगच्या समाप्तीनंतर अवघ्या काही तासांतच पाकने अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार करून पुन्हा एकवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
पाक सैनिकांनी काल रात्री ११.१५ च्या सुमारास येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बॉर्डर आऊट पोस्टवर आणि नागरी भागावर गोळीबार केला. एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अखनूरच्या पर्गवाल उपविभागात पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला.
हा गोळीबार मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. यात कोणत्याही जीवित हानीचे वृत्त नाही. पाकच्या या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी तात्काळ उत्तर दिले. पाकच्या गोळीबारात कोणतीही हानी झाली नाही. (वृत्तसंस्था)