फेसबुकवर आक्षेपार्ह विधान करणे पडले महागात.
By Admin | Updated: October 7, 2015 16:50 IST2015-10-07T16:50:01+5:302015-10-07T16:50:01+5:30
फेसबुकवर हिंदू देव-देवतांच्या फोटोवर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी जेवर कस्बे येथून एकाला अटक केली आहे.

फेसबुकवर आक्षेपार्ह विधान करणे पडले महागात.
>ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. ७ - फेसबुकवर हिंदू देव-देवतांच्या फोटोवर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी जेवर कस्बे येथून एकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी याविषयीची माहिती आपल्या विभागाच्या फेसबुक पेज वरुन दिली.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या मते अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मुस्तकीन असून तो जेवर कस्बे येथील राहणारा आहे. त्याला गौतम नगर येथून अटक केली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी या घटनेस गंभीरतेने घेतले आहे, आरोपीच्या विरोधात आयटी अॅक्ट ६६ आणि १५३ अ नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.