रेल्वेंची धडक, १ ठार
By Admin | Updated: December 8, 2015 23:38 IST2015-12-08T23:38:18+5:302015-12-08T23:38:18+5:30
हरियाणात पलवलजवळ मंगळवारी दोन रेल्वेंचा अपघात झाला. त्यानंतर सुरु असलेले हे मदतकार्य. दादर एक्सप्रेसला पाठीमागून येणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने ही दुर्घटना झाली.

रेल्वेंची धडक, १ ठार
हरियाणात पलवलजवळ मंगळवारी दोन रेल्वेंचा अपघात झाला. त्यानंतर सुरु असलेले हे मदतकार्य. दादर एक्सप्रेसला पाठीमागून येणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने ही दुर्घटना झाली.
पलवल : हरियाणाच्या पलवलनजीक मंगळवारी दाट धुक्यादरम्यान एका लोकलने दिल्लीकडे जाणाऱ्या लोकमान्य टिळक हरिद्वार एक्स्प्रेसला धडक दिली. या अपघातात लोकलचालकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. तथापि, दोन्ही गाड्यांमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
सकाळी ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे ईएमयूचालक कदाचित सिग्नल पाहू शकला नाही आणि लोकलने एक्स्प्रेसला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, लोकमान्य टिळक एक्स्पे्रसचा गार्ड डबा तसेच ईएमयू गाडीच्या इंजिनचा चक्काचूर झाला.
यामुळे ईएमयूचालक व सहचालक आत अडकले. प्रवाशांनी अनेक प्रयत्नांनंतर दोघांना बाहेर काढून रुग्णालयात हलविले. पलवल- गाझियाबाद ईएमयूचा चालक यशपाल याचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर सहचालक गंभीर आहे. एक्स्प्रेसचा गार्डही अपघातात जखमी झाला.