आधी पाया पडले नंतर गोळ्या झाडल्या, सीसीटीव्हीत घटना कैद
By Admin | Updated: February 10, 2017 15:52 IST2017-02-10T15:04:28+5:302017-02-10T15:52:25+5:30
एका विद्यार्थ्याची रस्त्यात गोळ्या झाडून हत्या,हल्लेखोरआधी सौरभच्या पाया पडले आणि नंतर...

आधी पाया पडले नंतर गोळ्या झाडल्या, सीसीटीव्हीत घटना कैद
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 10 - उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका विद्यार्थ्याची रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलीस आरोपिंचा शोध घेत आहेत.
सौरभ पांड्ये असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. दोन मोटार सायकलवर आलेल्या चार जणांनी सौरभची गोळ्या झाडून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे हल्लेखोरआधी सौरभच्या पाया पडले आणि नंतर डोक्यात आणि छातीत 4 गोळ्या झाडल्या. मृतक सौरभच्या भावाने हल्लेखोरांना ओळखलं असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सैरभ पांड्ये हा विद्यार्थी नेता असून तो नगरसेवक निवडणूक लढवण्याची तयारी करत होता. यामुळेच त्याच्यावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, याशिवाय आपापसातील वैरही यासाठी कारणाभूत असण्याची शक्यता आहे, कारण हल्लेखोर सौरभच्या ओळखीचे होते.