शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Falgu River: सीतेच्या शापातून मुक्त होणार फल्गू नदी, पाहा काय होता सीतामाईंचा शाप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 06:25 IST

Falgu River: पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे.

- विभाष झा पाटणा : पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे.

कोरड्या फल्गू नदीमध्ये पाणी राहावे, यासाठी रबर डॅमचे निर्माणकार्य वेगाने करण्यात येत आहे. मोकामाहून पाईपलाईनद्वारे गंगा नदीचे पाणी गयेपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. रबर डॅम लवकरच तयार होईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर गंगा नदीच्या पाण्याने फल्गू नदी खळखळू शकते. यामुळे फल्गू नदीत वर्षभर पाणी राहून येथे पिंडदानासाठी येणाऱ्या भाविकांनाही दिलासा मिळेल.

सध्या फल्गू नदीमध्ये पाणी नसल्यामुळे पिंडदानाला येणाऱ्या भाविकांना नदीच्या वाळूमध्ये दीड ते दोन फूट खोदकाम केल्यावरच पाणी मिळते. लोक येथे खोदकाम करून पाण्याने तर्पण करतात. गयाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन एसएम यांनी सांगितले की, फल्गू नदीवर रबर डॅम उभारण्याचे काम वेगाने केले जात आहे. 

काय होता शाप? पौराणिक कथेनुसार, राजा दशरथाचे पिंडदान फल्गू नदीच्या तीरावर सीता मातेने वटवृक्ष, गाय, तुळस, फल्गू नदी व ब्राह्मण यांना साक्षी मानून केले होते. त्यावेळी भगवान राम व लक्ष्मण पिंडदानाचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. ते परतल्यावर सीतामातेने त्यांना पिंडदानाबाबत सांगितले. त्यानंतर सीतेने ज्यांना साक्षी मानले होते, त्या सर्वांना बोलावले. परंतु वटवृक्ष सोडून कोणीही खरे सांगितले नाही. यामुळे नाराज झालेल्या सीतामातेने इतरांना शाप दिला व वटवृक्षाला वरदान देऊन सांगितले की, कुणाचेही पिंडदान तुझ्या पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही.

टॅग्स :riverनदीBiharबिहार