शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

लॉकडाउनमध्ये सुरू केली SBIची बनावट शाखा, तिघांना अटक; अशी झाली पोल-खोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 19:02 IST

एसबीआयच्या एका ग्राहकाने या ब्रँचसंदर्भात नॉर्थ बाजार ब्रँचमध्ये चौकशी केली. त्याने या बनावट ब्रँचची दिलेली एक पावती नॉर्थ बाजार ब्रँचच्या मॅनेजरला दाखवली. तेव्हा ते  थक्क झाले. यानंतर जेव्हा ते या बनावट बंकेत पोहोचले, तेव्हा बँक पाहून ते हैराण झाले.

ठळक मुद्देस्टेट बँकेच्या एका माजी कर्मचाऱ्याच्या 19 वर्षीय मुलाने स्टेट बँकेची ही बनावट शाखा सुरू केली होती. ही बनावट बँक हुबेहूब स्टेट बँके प्रमाणेच तयार करण्यात आली होती. ग्राहकांनी चौकशी केल्यानंतर पोल खोल

चेन्नै/कडलोर - तामिळनाडूतील कडलोर जिल्ह्यात पनरुत्ती येथे बनावट बँकेचे प्रकरण उगडकीस आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. स्टेट बँकेच्या एका माजी कर्मचाऱ्याच्या 19 वर्षीय मुलाने स्टेट बँकेची ही बनावट शाखा सुरू केली होती. स्टेट बँकेचे खरे ब्रँच मॅनेजर जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा ते बँकेचा सेटअप पाहून थक्क झाले. कारण ही बनावट बँक हुबेहूब स्टेट बँके प्रमाणेच तयार करण्यात आली होती. 

एसबीआयच्या एका माजी कर्मचाऱ्याचा मुलगा कमल बाबू याने या बनावट बँकेत कंप्यूटर, लॉकर, बनावट कागद आणि इतर काही गोष्टी ठेऊन हुबेहूब बँकेसारखेच बनले होते. एवढेच नाही, तर पनरुत्ती बाजार ब्रँच नावाने एक वेबसाईटदेखील तयार करण्यात आली होती. पोलिसांनी कमलसह ए कुमार (42) आणि एम मणिकम यांनाही अटक केली आहे. या लाकंनी लॉकडाउनदरम्यान एप्रिल महिन्यातच ही ब्रांच तयार केली होती.

ग्राहकांनी चौकशी केल्यानंतर पोल खोल - एसबीआयच्या एका ग्राहकाने या ब्रँचसंदर्भात नॉर्थ बाजार ब्रँचमध्ये चौकशी केली. एकाने या बनावट ब्रँचची दिलेली एक पावती नॉर्थ बाजार ब्रँचच्या मॅनेजरला दाखवली. तेव्हा ते  थक्क झाले. यानंतर जेव्हा ते या बनावट बंकेत पोहोचले, तेव्हा बँक पाहून ते हैराण झाले. कारण ही बँक हुबेहूब खऱ्या बँकेसारखीच दिसत होती. यानंतर या बनावट बँकेची पोल-खोल झाली. आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 473, 469, 484 आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगण्यात येते, की कमलचे वडील बँकेत कर्मचारी होती. त्यामुळे त्याचे सातत्याने बँकेत येणे-जाणे असल्याने, बँकेच्या कामकाजासंदर्भात त्याला पूर्ण माहिती होती. काही वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि आई निवृत्त झाली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने नोकरीसाठी अर्जही केला होता. मात्र, नोकरी मिळण्यास उशीर झाल्याने त्याने ही बनावट बँकच सुरू केली.

अद्याप फसवणुकीचा गुन्हा नाही, चौकशी सुरू -अद्याप एकाही ग्राहकाने फसवणुकीची तक्रार केलेली नाही. तसेच कमलनेही सांगितले, की कुणाला फसवण्यासाठी त्याने बँक सुरू केली नव्हती. मात्र, त्याची आई आणि काकूच्या अकाउंटदरम्यान मोठ्या प्रमाणावर ट्रांझेक्शन झाले आहेत. यासंदर्भातही चौकशी केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

देशात लवकरच धावणार 44 नव्या 'वंदे भारत' ट्रेन, 6 कंपन्यांनी लावली बोली, एका चिनी कंपनीचाही समावेश

मोठी बातमी : 59 चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आणखी 20 अ‍ॅप्सवर टांगती तलवार; सरकार केव्हाही घालू शकतं बंदी

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाEmployeeकर्मचारीbankबँकTamilnaduतामिळनाडू