फेक न्यूज : अलिबाबा, जॅक मा यांना समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:12 AM2020-07-27T05:12:59+5:302020-07-27T05:13:17+5:30

२० जुलै रोजी या प्रकरणी गुरुग्राम जिल्हा न्यायालयात न्यायाधीश सुषमा शिवखंड यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने जॅक मा, अलिबाबा कंपनीसह १२ उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना समन्स बजावला.

Fake News: Summons to Alibaba, Jack Ma | फेक न्यूज : अलिबाबा, जॅक मा यांना समन्स

फेक न्यूज : अलिबाबा, जॅक मा यांना समन्स

Next

नवी दिल्ली : भारताविषयी खोटी माहिती पसरविल्याप्रकरणी चीनमधील केवळ प्रचारी मजकूर प्रसारित करणाऱ्या यूसी ब्राऊझर अ‍ॅपची कंपनी अलिबाबा व संस्थापक जॅक मा यांना गुरूग्राम न्यायालयाने दणका दिला आहे. युसी ब्राऊझरमधील माजी कर्मचाºयाच्या तक्रारीवरून जिल्हा न्यायालयाने कंपनीस समन्स बजावला आहे. येत्या २९ जुलै पर्यंत त्यांना न्यायालयात हजर व्हावे लागेल.
२० जुलै रोजी या प्रकरणी गुरुग्राम जिल्हा न्यायालयात न्यायाधीश सुषमा शिवखंड यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने जॅक मा, अलिबाबा कंपनीसह १२ उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना समन्स बजावला. त्यांना महिनाभरात लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. अलिबाबा कंपनीने यावर कोणतेही स्पष्टीकरणे दिले नाही. परमार यांनी कंपनीला २ लाख ६८ हजार अमेरिकन डॉलर्सची नुकसान भरपाई मागितली आहे. त्यांची बाजू वकील अतुल अहलावत यांनी मांडली.
चिनी कंपनी अलिबाबाच्या व्यवस्थापन मंडळावर नियमाप्रमाणे कम्युनिस्ट पक्षाचा नेता सदस्य असतो. अप्रत्यक्षपणे पक्षाचा हस्तक्षेपही कंपनीच्या कामात होतो. युसीसह चिनी अ‍ॅपवर तिबेट, दलाई लामा, हाँगकाँग आंदोलन, हाँगकाँग राष्ट्रीय सुरक्षा कायदा, चीनमधील भ्रष्टाचार, भारत-चीन सीमावाद, लद्दाख, अक्साई चीन हे शब्द असलेला मजकूर प्रसारित केला जात नाही.
मात्र भारतीय नेत्यांविषयी कथित आक्षेपार्ह बातम्या, गरीबी, भ्रष्टाचार, बलात्कार, कचरा, अस्वच्छता, जात, धर्म, जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्क चळवळ, नागा-बोडो लँड आंदोलनाशी संबधित मजकूर मात्र आवर्जून प्रसिद्ध केला जातो. वापरकर्त्यांना विशिष्ट माहितीपासून दूर ठेवले जाते. परमार यांनी कंपनीच्या याच धोरणावर आक्षेप घेतला होता.

तक्रार काय आणि कोणाची?
भारताविषयी खोट्या बातम्या प्रसारित करणे, चीनविषयी संवेदनशील माहिती दडवण्यावर आक्षेप घेतल्याने अन्यायकारक पद्धतीने सहयोगी संचालक पदावरून हटवल्याची तक्रार पुष्पेंद्र सिंह परमार यांनी केली. पदावरून दूर करताना परमार यांना कंपनीने कोणतेही कारण दिले नाही. राजीनामा देण्याची सक्ती केली. त्यामुळे परमार यांनी न्यायालयात धाव घेतली.

Web Title: Fake News: Summons to Alibaba, Jack Ma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.