शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

हैदराबादेत नकली काझीला अटक, आतापर्यंत लावले २०० निकाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 2:25 AM

आतापर्यंत २०० निकाह लावणा-या एका नकली काझीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अली अब्दुल्ला रफाई असे त्याचे नाव आहे. पोलिसांना असा संशय आहे की, रफाईसोबत मुंबईचे मुख्य काझी फरीद अहमद खान हेही अशाच पद्धतीने निकाह करत होते.

हैदराबाद : आतापर्यंत २०० निकाह लावणा-या एका नकली काझीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अली अब्दुल्ला रफाई असे त्याचे नाव आहे. पोलिसांना असा संशय आहे की, रफाईसोबत मुंबईचे मुख्य काझी फरीद अहमद खान हेही अशाच पद्धतीने निकाह करत होते.हैदराबाद पोलिसांनी एका टोळीचा काही दिवसांपूर्वीच भंडाफोड केला होता. ही टोळी अल्पवयीन मुलींचे अरब देशात विवाह लावून देत होती. पोलिसांनी रफाई आणि फरीद यांच्यासह तीन काझींना अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.सहायक पोलीस आयुक्त ताजुद्दीन अहमद यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा वक्फ बोर्डाशी संपर्क केला तेव्हा कळाले की, २०१४ पासून रफाईसाठी एकही फॉर्म जारी करण्यात आला नाही. रफाईची काझी म्हणूनअसलेली नियुक्ती काही काळासाठी रोखली होती. त्याला त्यानेउच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबितआहे. काझी म्हणून काम करण्यास सद्या त्याला परवानगी नव्हती. त्यामुळेच बोर्डाने त्याला फॉर्म दिला नव्हता.वडिलांच्या जागी ८0 काझीरफाईच्या कार्यालयाची झडती घेणे बाकी आहे. कारण, येथील कागदपत्रे अरबी आहेत. त्याची पडताळणी करण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी वक्फ बोर्डाच्या नसीरुल कजाथ आणि अन्य दोन कर्मचा-यांची मदत घेतली आहे. पोलिसांना असा संशय आहे की, जेव्हा त्याच्या वडिलांचे २०१३ मध्ये निधन झाले त्यानंतर रफाईने वक्फ बोर्डाच्या कर्मचा-यांचा विश्वास मिळवला.वडिलांच्या मृत्यूनंतर रफाईला काझी म्हणून नियुक्ती मिळाली. पण, तो केवळ एकच दिवस काझी म्हणून राहिला. कारण, दुसºयाच दिवशी त्याची नियुक्ती रद्द करण्यात आली. तेलंगणात असे ८० काझी आहेत ज्यांना वडिलांच्या जागेवर नियुक्ती मिळाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा