संजय राऊत यांच्यावर फेकली शाई

By Admin | Updated: October 5, 2016 04:58 IST2016-10-05T04:58:39+5:302016-10-05T04:58:39+5:30

शिवसेनेचे खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर मंगळवारी लखनौमध्ये शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Fake ink on Sanjay Raut | संजय राऊत यांच्यावर फेकली शाई

संजय राऊत यांच्यावर फेकली शाई

लखनऊ : शिवसेनेचे खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर मंगळवारी लखनौमध्ये शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नेत्यावर शाई फेकण्याचा हा पहिलाच प्रकार असून, तो उत्तर प्रदेशात घडला हे विशेष.
शिवसेनेने लखनौमध्ये आयोजित केलेल्या रॅलीत हा प्रकार घडला. मात्र आपणावर शाई का फेकण्यात आली, हे मला समजू
शकले नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संजय राऊत यांच्या सतर्कतेमुळे शाई त्यांच्या अंगावर न पडता रस्त्यावर पडली. राऊत यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्याने शाई फेकल्यानं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शिवसैनिकानेच संजय राऊत यांच्यावर शाई का फेकली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार शिवसैनिकांच्या दोन गटांतील वादांतून हा प्रकार घडला असावा. संजय राऊत म्हणाले, माझ्यावर शिवसैनिकानेच शाई का फेकली याचा मी शोध घेत आहे. मी स्वत:च या प्रकरणात लक्ष घालत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Fake ink on Sanjay Raut