शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट IAS बनला, मुख्यमंत्र्यांसोबत केलं जेवण, फोटोही काढला; पण सत्य समोर आलं तेव्हा…

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 07:52 IST

तरूणानं आपल्याला युपीएससी परीक्षेत ३५७ वा रँक मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांनी त्याला सन्मानितही केलं होतं.

झारखंडमधील मुख्यमंत्री सचिवालयाच्या डोळ्यात धूळ फेकत, पलामूच्या एका बनावट आयएएसने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत फोटो काढला आणि अभिनंदन समारंभाला हजेरी लावली. स्वत:ला एक यशस्वी यूपीएससी आणि ३५७ रँकधारक म्हणून सांगणाऱ्या कुमार सौरभने मुख्यमंत्री सचिवालयालाही फसवल्याचा प्रकार घडला.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या समवेत आयोजित केलेल्या खानपानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्कार करण्यासाठी पडताळणी न करताच अशा प्रकारे कसे पाठवले गेले, ही सर्वात मोठी चूक सरकारकडून घडली आहे. ही चूक लक्षात आल्याने सरकारच्या वतीने कुमार सौरभवर रांचीच्या धुर्वा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ यानं आपल्याला युपीएससीच्या परीक्षेत ३५७ वा क्रमांक मिळाला असल्याचं स्वत:च सांगितलं होतं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

परंतु सत्य समोर आल्यानंतर शुक्रवारी पलामूचे उपायुक्त आंजनेयुल दोड्डे यांच्या सूचनेवरून पांडू बीडीओ राहुल ओराव यांनी पांडू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दुसरीकडे, राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे एमआयएस अधिकारी कुमार चंदन यांनी रांचीच्या धुर्वा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

समारंभाचं आयोजनमुख्यमंत्र्यांनी नागरी सेवा परीक्षा २०२१ मध्ये झारखंडच्या यशस्वी उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यासाठी विभागाच्या वतीने सर्व जिल्ह्यांच्या उपायुक्तांना आपापल्या क्षेत्रातील यशस्वी उमेदवारांची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. त्यात पलामू येथील यशस्वी व्यक्ती म्हणून कुमार सौरभ, पुत्र दिवंगत डॉ. दिलीप पांडे (रा.पांडू गाव) अशी माहिती देण्यात आली. यानंतर तथाकथित उमेदवाराला बोलावून मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते अशी माहिती एमआयएस प्राधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

यानंतर २६ जुलै रोजी तो सत्कार समारंभात आपल्या कुटुंबीयांसह सहभागीही झाला होता. तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा सन्मानही करण्यात आला. परंतु सत्य समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सौरभनं युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचं सांगत आपला ३५७ रँक आल्याचं सांगितलं. तसंच त्यानं आपलं अॅडमिट कार्डही पाठवलं. परंतु त्यात काही तथ्यांशी छेडछाड केल्याचंही समोर आलं.

खऱ्या उमेदवारानं आणलं सत्य समोर३५७ वा रँक मिळवणाऱ्या यूपीच्या कुमार सौरभला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्याने सौरभ पांडेचा पर्दाफाश केला. दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून कुमार सौरभची माहिती मिळाली. यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत कोणीतरी आपल्या नावाने फोटो काढल्याचे त्याला समजले. त्यानंतर कुमार सौरभ यानं पलामूच्या सौरभ पांडे याचे सत्य सर्वांसमोर आणले.

टॅग्स :JharkhandझारखंडPoliceपोलिस