कोलकात्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
By Admin | Updated: March 4, 2015 02:51 IST2015-03-04T02:51:36+5:302015-03-04T02:51:36+5:30
कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, तब्बल १० कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे.

कोलकात्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
१० कोटींचे चलन जप्त : एकाला अटक, प्रिंटिंग साहित्यही हाती
कोलकाता : कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, तब्बल १० कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे. याप्रकरणी एक जणाला ताब्यात घेतले असून, नोटा छापण्याचे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे.
पश्चिम बंगालमध्ये बनावट
नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून २७ फेब्रुवारीला पोलिसांनी चंद्रशेखर जयस्वाल (५०) या भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेतले होते.
त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी माणिकतला आणि दोमजूर येथे छापे टाकले. त्या ठिकाणी बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आले. तसेच त्या ठिकाणी नोटांची छपाई होत असल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांना या दोन्ही ठिकाणी अमेरिकन, तुर्की, झिम्बॉब्वे आणि इतर देशांचेही बनावट चलन हाती लागले आहे.
सिम कार्ड्स जप्त
जैस्वाल याच्या घरातून बनावट चलन, औद्योगिक उपकरणे, रसायने, शिक्के आणि धनादेश जप्त केले. शिवाय कोलकात्यातून विकत घेतलेले २० फोर जी डोंगल्स आणि न वापरलेली सिम काडर््सही जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
च्बनावट चलनाच्या या रॅकेटमध्ये एकापेक्षा अधिक लोक गुंतलेले असू शकतात, असा पोलिसांचा संशय आहे. शिवाय या रॅकेटचा संबंध दहशतवादी गटांशी नसेलच असेही नाही, असे स्पेशल टास्क फोर्सचे उपायुक्त अमित जवलगी यांचे म्हणणे आहे.
च्या प्रकरणाची अन्य बाजूही (दहशतवादी गटांशी संबंध) आम्ही शोधत आहोत. बनावट चलनाचे व्यवहार देशाबाहेरून चालू
आहेत का, याचा शोध घेण्यासाठी आम्ही केंद्रीय चौकशी संस्थांशीही संपर्क साधल्याचे जवलगी यांनी सांगितले. या प्रकरणात आणखीही काही जण गुंतले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.