शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ खरेदीदारांना दिलासा देण्यात अपयश; खाद्यपदार्थ महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 11:32 IST

जुलैमध्ये महागाई दर १३.९३ टक्के, तर जूनमध्ये १५.१८ टक्क्यांवर पोहोचला होता. जुलैमध्ये घाऊक महागाई १० महिन्यांच्या नीचांकावर आली आहे.

मुंबई : उत्पादनांच्या किमती कमी झाल्याने घाऊक किमतीवर आधारित महागाई ऑगस्टमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात १२.४१ टक्क्यांवर घसरली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्या असल्या तरी महागाईचा आकडा खाली आला आहे. सलग १७ महिन्यांपासून देशात महागाई दोन आकड्यांमध्ये असून, ग्राहकांना चटके बसत आहेत. 

जुलैमध्ये महागाई दर १३.९३ टक्के, तर जूनमध्ये १५.१८ टक्क्यांवर पोहोचला होता. जुलैमध्ये घाऊक महागाई १० महिन्यांच्या नीचांकावर आली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये महागाई दर १३ टक्क्यांवरून १०.६६ टक्क्यांवर आला होता. बटाटे काही प्रमाणात स्वस्त झाले आहेत, तर कांदे २४.७६ टक्के महाग झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानेही महागाईत वाढ झाल्याचे दिसत आहे.

काय स्वस्त काय महाग?ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थांची महागाई वाढून १२.३७ टक्क्यांवर पोहोचली. जुलै महिन्यात ती १०.७७ टक्के होती. जुलैमध्ये भाज्यांचे भाव वाढून २२.२९ टक्क्यांवर आले आहेत. जे मागील महिन्यात १८.२५ टक्क्यांवर होते. ऑगस्टमध्ये इंधन आणि विजेची महागाई ३३.६७ टक्के राहिली, जी मागील महिन्यात ४३.७५ टक्के होती. उत्पादने आणि तेलबियांची महागाई अनुक्रमे ७.५१ टक्के आणि नकारात्मक १३.४८ टक्के राहिली. किरकोळ महागाई सलग आठव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त राहिली. ऑगस्टमध्ये ती७ टक्के होती.

आरबीआयने काय केले? महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने या वर्षी व्याजदर तीन वेळा वाढवून ५.४० टक्क्यांवर नेले आहेत. असे असतानाही महागाई  ६ टक्क्यांच्या वरच आहे. केंद्रीय बँकेने २०२२-२३ मध्ये किरकोळ महागाईचा दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

नागरिकांवर काय परिणाम? घाऊक महागाईत दीर्घकाळ होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. याचा सर्वाधिक परिणाम उत्पादक क्षेत्रावर होतो. जर घाऊक किंमत जास्त राहिली तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. सरकार केवळ करांच्या माध्यमातूनच महागाई नियंत्रित करू शकते.

महागाई वाढल्याने अमेरिकेचा बाजार कोसळलाजागतिक आर्थिक मंदीच्या अहवालांदरम्यान  अमेरिकेत ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारी जाहीर करण्यात आली. आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये महागाई दर जुलैच्या ५.९ टक्केवरून वाढ होत ६.३ टक्के नोंदवला गेला. त्यामुळे अमेरिकन बाजारात डाऊ जोन्स, नॅस्डॅक आणि एस ॲण्ड पीमध्ये मोठी घसरण झाली. डाऊ जोन्स १२७६ अंकांनी, एस ॲण्ड पीमध्ये ४.३२ टक्के तर नॅस्डॅक ६३२ अंकांनी घसरला.

कर्जदारांच्या ईएमआयमध्ये पुन्हा वाढ? ऑगस्टमध्ये महागाईचा दर उच्चांकी राहिला असून, सप्टेंबरमध्येही महागाईचा दर अधिक राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या महिन्यात रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ करू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. ३० सप्टेंबरच्या धोरण आढावा बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.