सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश

By Admin | Updated: November 15, 2015 23:14 IST2015-11-15T23:14:39+5:302015-11-15T23:14:39+5:30

हायकोर्ट : अत्याचार प्रकरणात आरोपी निर्दोष

Failure to prove the crime to the government party | सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश

सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश

यकोर्ट : अत्याचार प्रकरणात आरोपी निर्दोष
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील एका अत्याचार प्रकरणात सरकारी पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आले. यामुळे न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडले आहे.
राम सदाशिव मेश्राम (५३) असे आरोपीचे नाव असून तो अडपल्ली येथील रहिवासी आहे. त्याच्यावर मूकबधिर व मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. ही घटना २ ऑगस्ट २०१२ रोजी घडली होती. वैद्यकीय तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले; परंतु आरोपीने अत्याचार केला हे सिद्ध होऊ शकले नाही. मुलीच्या आईने एटापल्ली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली होती. २१ जानेवारी २०१४ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७६(२)(एल)अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे.

Web Title: Failure to prove the crime to the government party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.