कृषि कार्यालयाचा अधिकार्यांअभावी बोजवारा
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:44+5:302015-06-15T21:29:44+5:30

कृषि कार्यालयाचा अधिकार्यांअभावी बोजवारा
>इंदापूर : तेरा दिवसांपूर्वी तालुका कृषी अधिका-यांनी पदभार सोडला आहे.हंगामी पदभार देण्यात आलेल्या भिगवणचे मंडल कृषी अधिकारी दोन दिवस इकडे तर चार दिवस तिकडे असा कारभार करत असल्याने,कर्मचारी वर्गावर कसले ही नियंत्रण राहिलेले नाही.त्यामुळे कृषी कार्यालयाच्या कामाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. पूवीर्चे तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव यांनी तीन साडेतीन वर्षे कामकाज पाहिले. आंबेगाव येथे बदली करुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. १ जून रोजी इथला पदभार सोडुन ते आंबेगावला रुजू झाले. चिपळूण येथे पदोन्नतीवर गेलेले इथल्या कामकाजाचा दीर्घ अनुभव असणारे आर.वाय.पवार यांनी येथे येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ते कधी येणार हे निित नाही. कामकाजाचा खोळंबा होऊ नये, यासाठी भिगवणच्या लावंड नावाच्या मंडल कृषी अधिका-याकडे तात्पुरत्या स्वरुपात तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, दोन दिवस इकडे,चार दिवस तिकडे असा कारभार त्यांच्या कडून केला जात आहे. परिणामी, कृषी कार्यालयातील कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणारे कुणी उरले नाही. चार दोन प्रामाणिक कर्मचारी वगळल्यास, इतर चकाट्या पिटत असल्याचे दिसते. कार्यालयाचे कामकाज रेंगाळले आहे. लाभार्थी, शेतकरी हेलपाटे मारुन वैतागले आहेत. काही तरी करा,पण एक साहेब आणा ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.