काँग्रेसला विश्वासार्हता मिळविण्यात अपयश- देव
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:24+5:302015-02-15T22:36:24+5:30
नवी दिल्ली : अलीकडील निवडणुकांमध्ये लागोपाठचा पराभव पाहू जाता काँग्रेसच्या नेतृत्वाला विश्वार्हता परत मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून येते, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. किशोरचंद्र देव यांनी तोफ डागली.

काँग्रेसला विश्वासार्हता मिळविण्यात अपयश- देव
न ी दिल्ली : अलीकडील निवडणुकांमध्ये लागोपाठचा पराभव पाहू जाता काँग्रेसच्या नेतृत्वाला विश्वार्हता परत मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून येते, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. किशोरचंद्र देव यांनी तोफ डागली.जोरदार प्रचार करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीवासीयांनी नाकारले. आम आदमी पार्टीला मिळालेला प्रचंड विजय हा मोदींविरुद्धच्या नकारात्मक मतदानाचाच परिणाम असल्याचा स्पष्ट संदेश दिल्ली विधानसभा निवडणुकीने दिला आहे, असे ते एका मुलाखतीत म्हणाले. पक्षात सर्व काही पैशातच मोजले जाते अशी सर्वसाधारण पक्षजनांमध्ये भावना आहे. ते खरे आहे की नाही याची पक्षनेतृत्वाने खातरजमा करून आवश्यक ते बदल करावे, असेही ते म्हणाले.