शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस, खट्टर, दास हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 05:10 IST

पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार आणण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते.

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये या राज्यांमधील गेल्या पाच वर्षांतील सुशासन हाच भाजपचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल व अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, मनोहर लाल खट्टर अणि रघुबीर दास हे विद्यमान मुख्यमंत्रीच पक्षातर्फे नेतृत्वाचे चेहरे म्हणून मतदारांपुढे आणले जातील, असे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार आणण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते.तेच सूत्र कायम ठेवून पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, फडणवीस, खट्टर व दास या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यांच्या सरकारांची उत्तम कामगिरी हाच पक्षाचा विधानसभा निवडणुकांमधील प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळाल्यावर हेच तीन मुख्यमंत्री त्या पदांवर कायम राहतील हे उघड आहे.हा नेता पुढे म्हणाला की, फडणवीस, खट्टर व दास या तिघांनीही जनतेसमोर आपली स्वच्छ प्रतिमा ठेवली असून, भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेल्या या राज्यांना गेली पाच वर्षे कोणत्याही घोटाळ्याविना सुशासन दिले आहे. त्या- त्या राज्यांमधील सरकारांची उत्तम कामगिरी, केंद्रातील स्वपक्षीय मोदी सरकारने घेतलेले अनेक धाडसी निर्णय व विरोधी पक्षांमधील फाटाफूट या सर्वांचा फायदाघेऊन या तिन्ही राज्यांमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची भाजपला पक्की खात्री आहे.खास करून महाराष्ट्र व हरियाणात विरोधी पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्यानेही पक्षाला बळकटी मिळाली आहे.त्यावेळी निकालानंतरच निवडले मुख्यमंत्रीमहाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तीन राज्यांमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुका भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव पुढे न करता लढविल्या होत्या व निकाल जाहीर झाल्यावरच मुख्यमंत्री निवडले गेले होते.विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात २८८ पैकी १२२, हरियाणात ९० पैकी ४७ व झारखंडमध्ये ८१ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा