शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

Pulwama Attack: पाकिस्तानी झेंडा 'टॉयलेट स्पेशल' टाईल्सवर, पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचा नवा पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 17:59 IST

गुजरातमध्ये एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टॉयलेट टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे.

ठळक मुद्देगुजरातमध्ये एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टॉयलेट टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे.पाकिस्तानचा झेंडा असलेल्या तसेच ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ असं लिहिलेल्या टाइल्स टाइल्स सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. पाकिस्तानचा निषेध करण्याच्या उद्देशाने आम्ही या टाइल्स बनवल्याची माहिती टाइल्स कारखान्याचे मालक सुरेश कौसुंदरा यांनी दिली.

अहमदाबाद - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गुजरातमध्ये एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टॉयलेट टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे.

पाकिस्तानचा झेंडा असलेल्या तसेच ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ असं लिहिलेल्या टाइल्स सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानचा निषेध करण्याच्या उद्देशाने आम्ही या टाइल्स बनवल्याची माहिती टाइल्स कारखान्याचे मालक सुरेश कौसुंदरा यांनी दिली. 'मागणी वाढेल त्याप्रमाणे आम्ही यांचे उत्पादन वाढवणार आहोत. मोरबी येथील सर्वाजनिक शौचालय बांधण्यासाठी या वापरल्या जातील. पण जर या टाइल्सना दुसऱ्या ठिकाणांहून मागणी आली तर आम्ही त्या मोफतही देण्यास तयार आहोत' असं सुरेश कौसुंदरा यांनी सांगितलं आहे.

काश्मीरमधील तरुणांना लष्करात जायचंय; 111 जागांसाठी तब्बल 2500 अर्जपुलवामा हल्ल्यानंतर हजारो तरुण लष्करात जाण्यास उत्सुक आहेत. बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरू केली आहे. 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लष्करातील भरतीला काश्मिरी तरुणांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. 'लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. आम्हाला नोकरीची फार कमी संधी आहे. लष्करात भरती होऊन आम्ही आमच्या कुटुंबाची सुरक्षा करू शकतो सोबत काळजीदेखील घेऊ शकतो' असं भरतीसाठी आलेल्या बिलाल अहमद या तरुणाने म्हटले आहे. तर 'आम्ही काश्मीरच्या बाहेर जाऊ शकत नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. काश्मीरमधील जवानांना संवेदनशील परिसरांमध्ये तैनात केलं तर ते स्थानिकांशी चर्चा करत जास्त चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात' असं ही एका तरुणाने सांगितलं आहे. 

Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी तो करतोय पैसे जमा

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे.  दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाGujaratगुजरातPakistanपाकिस्तान