विशाखापट्टणमजवळ फॅक्टरीला भीषण आग, ६ ऑईल टँक्सचा स्फोट
By Admin | Updated: April 27, 2016 09:07 IST2016-04-27T09:06:25+5:302016-04-27T09:07:01+5:30
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळील एका बायो-डिझेल युनिटमध्ये भीषण आग लागली असून ६ ऑईल टँक्सचा स्फोट झाला

विशाखापट्टणमजवळ फॅक्टरीला भीषण आग, ६ ऑईल टँक्सचा स्फोट
ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. २७ - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळील एका बायो-डिझेल युनिटमध्ये भीषण आग लागली असून ६ ऑईल टँक्सचा स्फोट झाला आहे. मंगळवारी रात्री लागलेली ही आग अजूनही धुमसतच असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४० गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने आत्तापर्यंत कोणीही जखमी झालेले नाही.
विशाखापट्टणमजवळील बायोमॅक्स या कंपनीत काल रात्री साडेसातच्या सुमारास अचानक लागली आणि इंधन व रॉ-मटेरियल्सचे सुमारे १५ टँक आगीत वेढले गेले. यावेळी कंपीनत १० कर्मचारी होते, मात्र त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान रात्रभर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून आग थोडी आटोक्यात आली आहे.
Fire accident at Biomax Fuels Limited in Duvvada, Visakhapatnam. 4 fire tenders at the spot, 7 more on the way. pic.twitter.com/Dfl3dHOUUM
— ANI (@ANI_news) April 26, 2016
Fire accident at Biomax Fuels Limited in Duvvada, Visakhapatnam UPDATE: 40 fire tenders now at the spot pic.twitter.com/ItTm2NFYHO
— ANI (@ANI_news) April 26, 2016