शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check : सुशांत प्रकरणाची चौकशी आता आरोग्यमंत्री हर्षवर्धन करणार? जाणून घ्या, व्हायरल सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 09:16 IST

Sushant Singh Rajput death case : सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही मीडियाच्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, आता सुशांत प्रकरणाची चौकशी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन करणार आहेत.

ठळक मुद्देडॉ. हर्षवर्धन यांनी स्वत: च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल होत आहे. बर्‍याच व्हायरल रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूबाबत वेगळीच थेअरी मांडली जात आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही मीडियाच्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, आता सुशांत प्रकरणाची चौकशी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन करणार आहेत. दरम्यान, या व्हायरल रिपोर्टमधील दावा सत्य आहे काय ? ते जाणून घ्या...

रिपब्लिक भारत या न्यूज चॅनलच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या बुलेटिनमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओ चॅनेलचा बुलेट 100 असे नाव असलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे शीर्षक सुशांत प्रकरणाची चौकशी स्वत: डॉ. हर्षवर्धन करणार आहेत, असे देण्यात आले आहे. मात्र, याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी स्वत: खुलासा केला आहे. 

डॉ. हर्षवर्धन यांनी स्वत: च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी सुशांत प्रकरणाची चौकशी माझ्या स्वत: च्या देखरेखीखाली करत आहे, असा दावा मीडियातील एका भागात केला जात आहे, तो चुकीचा आहे. या संदर्भात मी कोणाशीही बोललो नाही. तसेच, कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले नाही. कोणत्याही असंवेदनशील विधानावर विश्वास करणे टाळा."

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज रिपब्लिक भारत वगळता इतर कुठल्याही न्यूज प्लॅटफॉर्मवर नाही.

काय आहे निष्कर्ष ?डॉ. हर्षवर्धन यांनी सुशांत प्रकरणाची स्वत: चौकशी करण्यासाठी निवेदन दिले नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शेअर केल्या जाणार्‍या बातम्या खोट्या आहेत.

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्या, एम्सचा अहवालबॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा निष्कर्ष एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी काढला आहे. त्यामुळे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले का, यादृष्टीने सीबीआय तपास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्याच केली अशा निष्कर्षाप्रत मुंबई पोलीस आले होते. पण मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगून सुशांतचे कुटुंबीय आणि बिहार पोलिसांनी तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली होती. सुशांतसिंह याचा शवचिकित्सा अहवाल व अन्य बाबींची फेरतपासणी डॉ. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने केली. सुशांतसिंह याच्या व्हिसेराचा २० टक्के नमुना फेरतपासणीसाठी उपलब्ध असल्याने, त्याची तपासणी करून एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने हा निष्कर्ष काढला आहे. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतbollywoodबॉलिवूड