शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच झाली IAS म्हणून निवड?

By बाळकृष्ण परब | Updated: January 19, 2021 16:38 IST

OM birla Daughter News : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा मेसेजमधून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देयूपीएससीच्या परीक्षेमध्ये ९० जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचाही दावा त्यावरून आता व्हायरल होत असलेल्या या पोस्ट खऱ्या आहेत. की, खोटे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे

नवी दिल्ली - लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला ही नुकतीच आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्याबाबत एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात आला आहे. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये ९० जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावाही केला जातोय. असे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. सरकार आता गरीब आणि ग्रामीण भागातील मुलांना यूपीएससीमध्ये प्रवेश बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. त्यावरून आता व्हायरल होत असलेल्या या पोस्ट खऱ्या आहेत. की, खोटे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे.दरम्यान, प्रख्यात वृत्तसंस्था असलेल्या एएफपीने व्हायरल होत असलेल्या या मेसेजची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला आहे. एएफपीने सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेची मेरिट लिस्ट शोधली. त्यामध्ये अंजली बिर्ला यांचे नाव आणि परीक्षा क्रमांक दिसून आले. तसेच अंजली बिर्ला यांचे नाव यूपीएससीच्या वेबसाइटवरसुद्धा आहे. त्यामुळे ओम बिर्ला यांच्या कन्येला आयएएसमध्ये मागच्या द्वाराने प्रवेश देण्यात आल्याचा करण्यात आलेला दावा खोटा ठरला आहे. अंजली बिर्ला यांचे प्राथमिक शिक्षण कोटा येथे झाले. कोटा येथील सोफिया गर्ल्स स्कूलमधून १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीती रामजस कॉलेजमधून पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर आयएएसची परीक्षा दिली. या परीक्षेत अभ्यास करून त्यांनी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली.

अंजली बिर्ला यांनी भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्यानंतर आता महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात काम करण्यास आपले प्राधान्य असेल. असे अंजली बिर्ला यांनी सांगितले. तसेच यादरम्यान, जे काही लक्ष्य दिले जाईल, ते पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :om birlaओम बिर्लाFamilyपरिवारBJPभाजपाPoliticsराजकारणupscकेंद्रीय लोकसेवा आयोगSocial Viralसोशल व्हायरल